"जो हिंदू हित की बात करेगा...", विधानसभा निवडणूक निकालावर प्रसाद ओकची लक्षवेधी पोस्ट; म्हणतो-"हिंदू ऐक्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:02 IST2024-11-23T16:00:02+5:302024-11-23T16:02:42+5:30
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Election) निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.

"जो हिंदू हित की बात करेगा...", विधानसभा निवडणूक निकालावर प्रसाद ओकची लक्षवेधी पोस्ट; म्हणतो-"हिंदू ऐक्य..."
Prasad Oak Post: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Election) निवडणुकीचे निकाल येत आहे. यात जनतेने महायुतीच्या बाजूने मोठा कौल दिला आहे. राज्यात मोठ्या बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. दरम्यान, राजकीय तसेच मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, त्यावर मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) सोशल मीडियावर एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे.
प्रसाद ओकने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर निवडणूक निकालावर मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत त्यामध्ये लिहलंय, “धर्मो रक्षति रक्षित: हिंदू ऐक्य चिरायू होवो” तर दुसऱ्या स्टोरीमध्ये “जो हिंदू हित की बात करेगा… वही देश पर राज करेगा!!” असं त्याने म्हटलं आहे. प्रसाद ओकच्या या स्टोरीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती २२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.