अद्भुत अनुभव, त्रिवेणी संगम स्नान! प्रवीण तरडे अन् पत्नी स्नेहल यांची महाकुंभमेळ्याला उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:16 IST2025-01-30T09:14:06+5:302025-01-30T09:16:23+5:30
महाकुंभमेळा २०२५ सुरु झाल्यापासून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा होताना दिसते आहे.

अद्भुत अनुभव, त्रिवेणी संगम स्नान! प्रवीण तरडे अन् पत्नी स्नेहल यांची महाकुंभमेळ्याला उपस्थिती
Pravin Tarde And Snehal Tarde: महाकुंभमेळा २०२५ सुरु झाल्यापासून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा होताना दिसते आहे. त्यामुळे भारतात महाकुंभमेळ्याचं पवित्र आणि धार्मिक वातावरण निर्माण झालंय. यासाठी जगभरातून भाविक येत आहेत. यंदाच्या महाकुंभमेळ्यात अनेक प्रसिद्ध लोक सुद्धा भेटी देताना दिसत आहे. शिवाय अनेक हॉलीवडू सेलिब्रेटींनी कुंभमेळ्यात हजेरी लावल्याचं पाहायला मिळाली. दरम्यान, काल मौनी अमावस्येच्या शाही स्नानासाठी प्रयागराजमध्ये बुधवारी लाखो भाविक आले. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवली. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत स्नेहल तरडे यांनी चाहत्यांना माहिती दिली.
दरम्यान, प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर प्रवीण तरडे यांनी शाही स्नान केलं. शिवाय त्यांच्या पत्नी स्नेहल यांनीदेखील अतिशय श्रद्धापूर्वक शाही स्नान केलं. नुकताच इन्स्टाग्रामवर स्नेहल यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, "अद्भुत अनुभव..., त्रिवेणी संगम स्नान, 29 जानेवारी 2025, मौनी अमावस्या, महाकुंभ 2025, प्रयागराज, उत्तर प्रदेश." अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
वर्कफ्रंट
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या चित्रपटातून प्रवीण तरडेंनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाचीही छाप पाडली. मराठी कलाविश्वातील परफेक्ट जोडी म्हणून प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे या जोडीकडे कायम पाहिलं जातं. प्रवीण तरडे एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आहेत. तर, स्नेहल सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे स्नेहल यांनी 'वेदांचा अभ्यास' पूर्ण केलेला आहे. आता त्यांनी पतीच्या पावलावर पाऊल ठेवत 'फुलवंती' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.