कुणाच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर ? रिलेशनशिपबाबत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:44 IST2024-03-28T13:40:47+5:302024-03-28T13:44:46+5:30
अभिनेत्रीने लव्ह लाईफबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे.

कुणाच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर ? रिलेशनशिपबाबत म्हणाली...
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने आपल्या अभिनय आणि सुरेल स्वरांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. केतकीने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. सध्या सर्वत्र केतकी हिची चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय अभिनेत्रीने लव्ह लाईफबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे.
केतकी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिनं 'माझ्या प्रिय लोकांशी बोलूया, पण फक्त 10 मिनिटे हा', असं म्हणतं इन्स्टाग्राम स्टोरीवर 'आस्क मी' सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्यांना तिला तिच्या रिलेशनशिप स्टेट्स बद्दल विचारलं. यावर केतकीने 'मी देवाच्या, मित्रांच्या, माझ्या कुटुंबियांच्या आणि त्याचबरोबर माझ्या संपूर्ण चाहत्यांच्या प्रेमात आहे' असं हटके उत्तर दिलं. यासोबतच केतकीनं चाहत्यांच्या आणखी काही प्रश्नांची अगदी मनमुरादपणे उत्तरे दिली. तिचे हे उत्तर ऐकून चाहतेही खूश झाले.
'टाईमपास'च्या 'प्राजु'ला खऱ्या आयुष्यातला 'दगडू' कधी मिळणार? असा प्रश्न आहे चाहत्यांना पडलेला असतो. चाहते नेहमीच केतकी माटेगावकर हिला तिच्या जोडीदाराबद्दल, रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारताना दिसतात. पण, केतकी आपलं खाजगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे केतकीच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे. हे अद्याप कळू शकलेलं नाही. याआधीही तिनं आपलं लग्न झालं असून माझा नवरा हे माझं म्युझिक असल्याचं म्हटलं होतं.