फोटोतील 'हा' चिमुकला आज आहे मोठा अभिनेता; पत्नी आणि मुलगीदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:13 IST2023-05-31T16:12:34+5:302023-05-31T16:13:50+5:30

Marathi celebrity: सध्या मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो व्हायरल झाला आहे.

do you recognize this marathi celebrity in the photo | फोटोतील 'हा' चिमुकला आज आहे मोठा अभिनेता; पत्नी आणि मुलगीदेखील आहे अभिनेत्री

फोटोतील 'हा' चिमुकला आज आहे मोठा अभिनेता; पत्नी आणि मुलगीदेखील आहे अभिनेत्री

सध्याचा काळ हा समाजमाध्यमांचा आहे त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतात. यात अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानसहान अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात काही वेळा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात सध्या मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो खुद्द या अभिनेत्यानेच शेअर केला असून मला ओळखा पाहू? असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या फोटोत या चिमुकल्याने चेक्सची पँट आणि त्यावर शर्ट घातला आहे. तसंच सगळ्या मुलांमध्ये तो एकटाच दिलखुलासपणे हसत आहे. विशेष म्हणजे फोटोत दिसणारा हा चिमुकला आज लोकप्रिय मराठी अभिनेता असून त्याची पत्नी आणि मुलगीदेखील कलाविश्वात सक्रीय आहेत. त्या दोघीदेखील उत्तम अभिनेत्री आहेत.

दरम्यान, या फोटोत दिसत असलेला चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता सचिन पिळगांवकर आहे. सचिन यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर अभिनेता, दिग्दर्शक असा बराच मोठा प्रवास त्यांनी कलाविश्वात केला आहे. इतकंच नाही तर मराठी सह हिंदी सिनेमा, मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
 

Web Title: do you recognize this marathi celebrity in the photo