'धुमधडाका' सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का? कुठे आहे ही जागा? 'या' सिनेमाचंही झालंय तिथे शूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:09 IST2025-07-11T15:06:49+5:302025-07-11T15:09:17+5:30
'धुमधडाका' सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का? कुठे आहे ही जागा जाणून घ्या...

'धुमधडाका' सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का? कुठे आहे ही जागा? 'या' सिनेमाचंही झालंय तिथे शूट
DhumDhadaka Movie: ‘व्याख्या, विख्खी, वुख्खू’ हा डायलॉग कानावर पडताच 'धुमधडाका' हा चित्रपट आठवतो. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील डायलॉग्ज आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, शरद तळवलकर, प्रेमा किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट मराठीतील सर्वात्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटांचं कथानक हे धनाजी वाकडे यांच्या बंगल्याभोवती फिरतं. परंतु, तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटाचं शूटिंग नक्की कुठे झालंय...
'धुमधडाका' हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला की लोक मोठ्या आवडीने पाहतात. धनाढ्य संपत्तीचा मालक असलेल्या धनाजीराव वाकडे यांचा तो बंगला अनेकांना आवडला. हा बंगला नेमका कुठे आहे? याची उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून याचं उत्तर समोर आलं आहे. 'धुमधडाका' चित्रपटातील धनाजी वाकडे यांचा तो बंगला हा पन्हाळामध्ये आहे. कोल्हापूरुपासून अवघ्या २२ कि.मी अंतरावर हा बंगला आहे. 'धुमधडाका' या चित्रपटाप्रमाणे या बंगल्याची देखील खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर 'RJ AKSHAY' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
शिवाय याच ठिकाणी अशोक सराफ यांच्या आणखी एका सिनेमाचं देखील शूटिंग करण्यात आलं आहे. त्या सिनेमाचं नाव आहे प्रेमांकुर या सिनेमामध्ये अशोर सराफ यांच्यासोबत अभिनेत्री निशिगंधा वाड प्रमुख भूमिकेत होत्या. त्याचबरोबर पन्हाळ्याच्या बाजूला मसाई नावाचं पठार आहे तिथे संजय लीला भन्साळींच्या पद्मावत सिनेमाचं शूटिंग झालं आहे.