कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे एक वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 14:13 IST2018-05-04T08:43:58+5:302018-05-04T14:13:58+5:30

प्रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट प्रचंड गाजला ...

Coffee and many things are for the film's frenzy. A bad news | कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे एक वाईट बातमी

कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे एक वाईट बातमी

रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. या चित्रपटाच्या यशानंतर कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू झाली असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षऱशः डोक्यावर घेतले होते. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वल येणार हे कळल्यानंतर या चित्रपटाचे फॅन्स खूप खूश झाले होते. पण कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा विचार रद्द करण्यात आला आहे. 
कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाचा सिक्वल कधी येणार याची उत्सुकता या चित्रपटाच्या फॅन्सना लागली होती. या चित्रपटातील वैभव, प्रार्थना यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे त्यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये देखील पाहायला मिळेल असे या चित्रपटाच्या चाहत्यांना वाटले होते. वैभव, प्रार्थना, भूषण प्रधान आणि नेहा महाजन यांचा धुवाँधार परफॉर्मन्स प्रेक्षकांना सिक्वलमध्ये देखील पाहायला मिळेल अशी सगळ्यांना खात्री होती. पण या चित्रपटाचा सिक्वल आता होणार नाहीये असे या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी सांगितले आहे. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या सिक्वलविषयी प्रकाश कुंटे सांगतात, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचे आमच्या डोक्यात कित्येक दिवसापासून सुरू होते. पण what's up लग्न हा चित्रपट आल्यानंतर आमचा हा विचार बदलला. कारण कॉफी आणि बरंच काही या चित्रपटात जोडप्याचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार हे प्रेक्षकांना दाखवण्याचा आमचा विचार केला होता. पण त्याच जोडीची मुख्य भूमिका असलेला आणि त्याच धर्तीचा what's up लग्न चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचे आम्ही रद्द केले. 

Also Read : वैभव तत्ववादीच्या या सिनेमाच शूटिंग होणार दुबईला, सिनेमात अशी असणार भूमिका

Web Title: Coffee and many things are for the film's frenzy. A bad news