अखेर सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:57 IST2025-01-29T11:54:11+5:302025-01-29T11:57:23+5:30
'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; केदार शिंदे करणार दिग्दर्शन

अखेर सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर
Suraj Chavan Zhapuk Zhupuk Cinema: 'बिग बॉस' मराठीचं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. या पर्वामध्ये बारामतीमधील छोट्याश्या मोढेवे गावातून आलेला सूरज चव्हाण (Suraj Chavan) लोकप्रिय झाला. या कार्यक्रमाने त्याला नवी ओळख मिळाली. त्याचबरोबर तो महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफिवर सुद्धा गुलिगत किंग सूरजने आपलं नाव कोरलं. सूरजच्या साध्या भोळ्या स्वभावावर महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम केलं आहे. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेमध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग डिरेक्टर केदार शिंदे यांनी सुरज चव्हाणसोबत एक चित्रपट करणार असल्याचे जाहीर केलं होतं. 'झापुक झुपूक' असे या सिनेमाचे नाव आहे. दरम्यान, नुकतीच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
नुकतेच सोशल मीडियावर 'झापुक झुपूक' सिनेमाच्या सेटवरचे फोटो समोर आले आहे. जियो स्टुडिओ मराठी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. जिओ स्टुडिओजने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटलंय की,"'बाईपण भारी देवा' च्या अभूतपूर्व यशानंतर, केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एक धमाकेदार प्रोजेक्ट! 'बिग बॉस' सुपरस्टार सुरज चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'झापुक झुपूक' या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे."
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित 'झापुक झुपूक' या सिनेमाचं दिग्दर्शनाची धुरा केदार शिंदे सांभाळणार असून ज्योती देशपांडे आणि बेला शिंदे यांनी निर्मिती केली आहे. या सिनेमामध्ये 'बिग बॉस' विजेत्या सूरज चव्हाणसह या दीपाली पानसरे, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि पुष्कराज चिरपुटकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.