​ चिराग-सना चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 13:50 IST2016-11-26T13:47:50+5:302016-11-26T13:50:00+5:30

      priyanka londhe  वजनदार या चित्रपटात नुकताच झळकलेला अभिनेता चिराग पाटील लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. आपल्या अभिनयाने ...

After the installation of the lamp, | ​ चिराग-सना चढणार बोहल्यावर

​ चिराग-सना चढणार बोहल्यावर

 
  priyanka londhe

 वजनदार या चित्रपटात नुकताच झळकलेला अभिनेता चिराग पाटील लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. आपल्या अभिनयाने अनेक तरुणींना घायाळ करणाºया चिरागला सना अंकोलाने क्लिन बोल्ड केले आहे. सलील अंकोला यांची मुलगी सना सोबत चिराग १ डिसेंबर रोजी लग्न करीत आहे. या संदर्भात लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना त्याने त्यांच्या प्रेमकहाणीचे पैलु उलगडले. चिराग सांगतो, सलील अंकोला आणि आम्ही बºयाच दिवसांपासुन फॅमिली फ्रेन्ड्स आहोत. मी सनाला लहानपणा पासूनच ओळखतो. आम्ही दोघे चांगले मित्र देखील होतो. पण मला सनामध्ये माझी जोडीदार दिसली. गेल्या सहा वर्षांपासून मी तिला पटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे देखील चिरागने मिश्कीलपणे सांगितले. सध्या देशामध्ये जवान सीमेवर लढत आहेत. अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देखील दिले आहे. अशा परिस्थितीत मला एकदम धुमधाडाक्यात लग्न करायला अजिबातच आवडणार नाही. मी लग्नावर वायफळ खर्च करु इच्छित नसल्यानेच मी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.  नोटाबंदीच्या निर्णयाशी मी आणि माझे कूटूंब सहमतच आहे. मोदींनी घेतलेला निर्णय बरोबरच आहे. एक वषार्नंतर आपल्याला देशामध्ये अतिशय चांगले दृष्य पाहायला मिळेल. त्यामुळे लग्नासाठी मला नोटाबंदीचा फार काही त्रास झाला नाही. मुळातच मी लग्नावर फार काही पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेतल्याने या नोटाबंदीचा माझ्या लग्नावर काहीही परिणाम झालेला नाही. असेही चिरागने सांगितले. 

 

Web Title: After the installation of the lamp,