"आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर…"; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहून भाग्यश्री मोटेने लिहिलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:56 IST2025-10-31T17:54:48+5:302025-10-31T17:56:30+5:30
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमा बघून लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे

"आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर…"; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहून भाग्यश्री मोटेने लिहिलेली पोस्ट चर्चेत
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा आज रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा होती. महेश मांजरेकरांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' सिनेमानंतर १६ वर्षांनी नवीन विषय घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमाच्या काल झालेल्या प्रीमिअर शोला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी भाग्यश्री मोटेने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
भाग्यश्री मोटेने 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातील कलाकारांसोबत फोटो शेअर करुन लिहिलंय की, ''शेती आणि शेतकरी माझ्या अत्यंत जवळचा आणि हळवा विषय, महेश मांजरेकर सर धन्यवाद तुम्ही ह्या विषयावर भाष्य करणारा सिनेमा केलाय आणि त्यात भर म्हणजे महाराजांचं बळीराजाशी दाखवलेलं नातं. सिद्धार्थ बोडके तू कमाल नट आहेसच, मी कायमच तुझ्या कामाची फॅन आहे आणि इथे तर तू महाराजांना जिवंत केलास! powerful, हादरवून टाकणारा काम!''
''त्रिशा ठोसर इतक्या लहान वयातही किती गोड काम करतेस! नित्यश्री खूप बर वाटतय तुला इतक्या चांगल्या scale ला बघून! आपला फोटो राहिला but keep it up... last but not least सिद्धार्थ जाधव अगदी तोडलास मित्रा, तुझ्या वाटेला आलेला प्रत्येक काम कसा चोख पार पाडतोस तू, आता थांबायचं नाय... चित्रपट संपताना वाटला खरच आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर… सगळ्या टीम चे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. नक्की बघा.'', अशी पोस्ट लिहून भाग्यश्री मोटेने 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं कौतुक केलं आहे.
