मराठी अभिनेत्रींचे बॉलीवूडमध्ये पदार्पण!

By Admin | Updated: December 1, 2014 00:42 IST2014-12-01T00:42:27+5:302014-12-01T00:42:27+5:30

संजय भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अनुजा गोखले या झळकणार असून बाजीरावांच्या बहिणी असलेल्या अनुबाई आणि भिऊबाई या व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

Marathi actress debut in Bollywood | मराठी अभिनेत्रींचे बॉलीवूडमध्ये पदार्पण!

मराठी अभिनेत्रींचे बॉलीवूडमध्ये पदार्पण!

संजय भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अनुजा गोखले या झळकणार असून बाजीरावांच्या बहिणी असलेल्या अनुबाई आणि भिऊबाई या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अभिनेते रणवीर सिंह हे बाजीरावाची भूमिका साकारणार असून मस्तानीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण आहेत. या सिनेमातून पेशवा बाजीराव आणि सौदर्यवती मस्तानी यांची प्रेमकथा रंजकपणे उलगडणार आहे. भन्साळी यांचा दिग्दर्शनाचा अनुभव लक्षात घेता 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा भव्य-दिव्यतेत कमी ठरणार नाही यात शंका नाही. माझी भूमिका छोटी आहे की मोठी याबद्दल मला फारशी माहिती नसून लोकांच्या स्मरणात ती नक्की राहील याची खात्री आहे, असे सुखदा म्हणाली. अनुजाने 'असा मी अशी ती', 'कॅपेचिनो', 'राखणदार' यांसारखे मराठी सिनेमे आणि 'अग्निहोत्र', 'पुणेरी मिसळ', 'लगोरी' यांसारख्या मालिकेतून भूमिका केल्या आहेत.

Web Title: Marathi actress debut in Bollywood