Video: कोळीगीतावर ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:15 AM2024-05-27T11:15:59+5:302024-05-27T11:17:09+5:30

Aishwarya narkar: ऐश्वर्या आणि अविनाश यांनी पहिल्यांदाच एका कोळीगीतावर एकत्र डान्स केला आहे.

marathi actress aishwarya narkar and avinash narkar share dance video on koli song | Video: कोळीगीतावर ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल; व्हिडीओ होतोय व्हायरल

Video: कोळीगीतावर ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल; व्हिडीओ होतोय व्हायरल

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर रुपेरी पडद्यासह छोटा पडदा गाजवणारी जोडी म्हणजे अविनाश नारकर (avinash narkar) आणि ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar). गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यांमुळे सोशल मीडियावर कायम त्यांची चर्चा रंगत असते. कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावही तितकीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे अनेकदा ते ट्रेंडींग रील्स, व्हिडीओ फॉलो करतांना दिसतात.

ऐश्वर्या आणि अविनाश कोणताही नवा ट्रेंड आला की तो आवर्जुन फॉलो करतात. मग ते एखादं गाण असो किंवा मग डायलॉग ही जोडी त्यावर एक तरी व्हिडीओ करतेच. यात सध्या त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या जोडीने चक्क कोळी गाण्यावर डान्स केला आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी 'आगरान गेलू मी डोंगरान गेलू गो' या कोळी गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर त्यांनी पहिल्यांदाच रील केल्यामुळे त्यांचा व्हिडीओ चर्चेत येत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश ही जोडी बऱ्याचदा एकत्र व्हिडीओ शूट करुन ते पोस्ट करत असतात. यात काही वेळा ते मजेशीर डायलॉग्स किंवा अशा ट्रेंडी गाण्यावर व्हिडीओ करतात.

Web Title: marathi actress aishwarya narkar and avinash narkar share dance video on koli song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.