'धुरंधर'च्या वादळात 'या' सिनेमाची होतेय चर्चा! करण जोहरही झाला चाहता, म्हणाला-"माझ्या डोळ्यात पाणी…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:29 IST2026-01-12T14:27:25+5:302026-01-12T14:29:23+5:30

'धुरंधर'नंतर करण जोहर पडला 'या' सिनेमाच्या प्रेमात! खास पोस्ट केली शेअर, म्हणाला-"मी नि:शब्द झालो, कारण..."

karan johar reaction after watching haq movie praise yami gautam shared special post | 'धुरंधर'च्या वादळात 'या' सिनेमाची होतेय चर्चा! करण जोहरही झाला चाहता, म्हणाला-"माझ्या डोळ्यात पाणी…"

'धुरंधर'च्या वादळात 'या' सिनेमाची होतेय चर्चा! करण जोहरही झाला चाहता, म्हणाला-"माझ्या डोळ्यात पाणी…"

Karan Johar Post About Haq Movie: अलिकडच्या काळात बॉलिवूडमध्ये सत्य घटनेवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, त्यातील काही चित्रपट थिएटर्समध्ये चांगली कामगिरी करु शकले नसले तरी ओटीटीवर हेच चित्रपट ट्रेंड करू लागतात. असाच एक चित्रपट म्हणजे हक. अभिनेत्री यामी गौतम आणि इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला हक सिनेमा ७ नोव्हेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कोर्टरुम ड्राम असलेल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकसं यश मिळालं नाही. परंतु, ओटीटीवर रिलीज होताच या चित्रपटाला सगळ्यांची वाहवाह मिळते आहे. इतकंच नाहीतर हा चित्रपट पाहून बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर भावुक प्रतिक्रिया दिली आहे. 


अलिकडेच'हक' चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टने यामी गौतमचं कौतुक केलं होतं. आता करण जोहरलाही यामीचं कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. करणने हक सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय की, शाझिया बानो यांची  कहाणी आणि संघर्ष पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.शेवटी मी नि शब्द झालो. शिवाय आम्ही चित्रपटासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. फक्त मला एकाच गोष्टीचा पश्चाताप होतोय की मी हा चित्रपट  थिएटरमध्ये पाहण्याची संधी गमावली. 

करण जोहरने या पोस्टमध्ये यामी गौतमचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यामध्ये करणने म्हटलंय,"इतक्या वर्षांत कोणाच्या कामाने मी इतका प्रभावित झालो असेन, याबद्दल मला आठवत नाही.यामी गौतम अप्रतिम कलाकार आहे. ती कोणत्याही ठराविक 
विचारसरणीची नाही. तिचं मौन,तिची नजर, त्याचा  चित्रपटातील तिचा शेवटचा सीन,  संपूर्ण अभिनय हे कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तिच्या या मेहनतील सलाम...!" असं म्हणत करण जोहरने यामीबद्दल कौतुगोद्गार काढले आहेत.

हक हा सिनेमा शहाबानो यांच्यावर आधारित आहे.पेशाने वकील असलेला पती त्यांना सोडून जातो आणि त्यानंतर घटस्फोट आणि पोटगीसाठी त्या न्यायालयापर्यंत धाव घेतात. अखेरीस ही वैयक्तिक लढाई महिलांचे हक्क, धर्म आणि न्यायापर्यंत पोहोचते. सुपर्ण.एस.वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे एकीकडे धुरंधर सिनेमाची चर्चा असताना आता ओटीटीवर या सिनेमाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.

Web Title : 'हक' फिल्म की धूम: करण जौहर हुए भावुक, यामी गौतम की प्रशंसा की

Web Summary : यामी गौतम और इमरान हाशमी अभिनीत फिल्म 'हक' को ओटीटी प्लेटफॉर्म पर प्रशंसा मिल रही है। करण जौहर ने यामी के अभिनय की सराहना करते हुए कहा कि फिल्म ने उन्हें भावुक कर दिया और उन्हें सिनेमाघरों में इसे देखने से चूकने का अफसोस है। आलिया भट्ट ने भी फिल्म में यामी के प्रदर्शन की सराहना की, जो शाह बानो के मामले पर आधारित है।

Web Title : 'Haq' Movie Buzz: Karan Johar Moved to Tears, Praises Yami Gautam

Web Summary : The film 'Haq,' starring Yami Gautam and Emraan Hashmi, gains acclaim on OTT platforms. Karan Johar praises Yami's performance, saying the film moved him to tears and regrets missing it in theaters. Alia Bhatt also praised Yami's performance in the film, which is based on Shah Bano's case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.