पापराझींना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात ? अभिनेत्री जान्हवी कपूरने खरं काय ते सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 11:37 AM2024-05-26T11:37:43+5:302024-05-26T11:39:06+5:30

नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिनं पापाराझींवर भाष्य केलं.

Janhvi Kapoor sheds light on paparazzi culture: There's a celebrity ration card | पापराझींना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात ? अभिनेत्री जान्हवी कपूरने खरं काय ते सांगून टाकलं

पापराझींना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात ? अभिनेत्री जान्हवी कपूरने खरं काय ते सांगून टाकलं

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. यादरम्यान नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिनं पापाराझींवर भाष्य केलं. यासोबतच सेलिब्रिटी हे पापाराझींना बोलवातात की ते पापाराझी स्व:ताहून पोहचतात, याचा खुलासा जान्हवीनं केला आहे. 

अलिकडेच जान्हवीने 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. यावेळी तिनं अनेक मुद्यावर भाष्य केलं. याच मुलाखतीत जान्हवीला सेलिब्रिटी स्वतः या पापाराझींना मुंबई विमानतळ आणि जिमच्या बाहेर त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी बोलवात का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'ही गोष्ट त्या सेलिब्रिटीवर अवलंबून असते. आता सध्या माझ्या चित्रपटाचे प्रमोशन चालू आहे, तर मी त्यांना बोलावलं आहे. पण, जेव्हा माझं शुटिंग नसतं किंवा प्रमोशन नसतं, तेव्हा ते स्व:ताहून येतात. पापाराझी कारचा पाठलाग करतात कारण, त्यांना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात'.

जान्हवी कपूरने सांगितले की, फोटोग्राफर्सकडे प्रत्येक सेलिब्रिटीच्या फोटोचे रेट कार्ड असते. प्रत्येक फोटोसाठी त्यांना पेसे मिळतात. ती म्हणाली,  'प्रत्येक सेलिब्रिटीचं रेट कार्ड असतं. संबंधित सेलिब्रिटीच्या किंमतीनुसार ते फोटो विकले जातात. जर तुमची किंमत जास्त असेल तर पापाराझी स्वतः येतात. तुमच्या कारचा पाठलाग करतात.  पण जर तुमची किंमत तेवढी जास्त नसेल तर सेलिब्रिटी किंवा त्यांचे पीआर स्वत: फोन करून पापाराझींना बोलवातात'.


 
यासोबतच जान्हवीने जिमच्या बाहेर काढल्या जाणाऱ्या फोटोंबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, 'मी पापाराझींना माझ्या जिमच्या बाहेर येणे थांबवण्याची विनंती केली होती. त्या लोकांनीही माझं ऐकलं. आता ते माझ्या जिमच्या बाहेर येत नाही. त्यांनी मला दररोज तंग कपड्यांमध्ये पाहणं मला आवडतं नाही'.  दरम्यान पापाराझी म्हणजे कधी सेलिब्रिटींच्या मर्जीने तर कधी मर्जीविना फोटो काढणारे लोक. हे लोक सेलिब्रिटींचे क्लिक केलेले फोटो कोणत्याही वर्तमानपत्राला, मॅगझिनला, चॅनेलला विकतात. किंवा अशा कोणत्याही पापाराझी चॅनेलला विकतात, त्यांच्यासाठी काम करतात. 

Web Title: Janhvi Kapoor sheds light on paparazzi culture: There's a celebrity ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.