'लाखों दिलों की धडकन' Team India ची स्टार फलंदाज स्मृती मानधना 'या' सेलिब्रिटीला करतेय डेट? टॅटूमुळे गुपित उघड झाल्याच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:32 IST2022-03-15T19:24:22+5:302022-03-15T19:32:14+5:30
स्मृतीचे या आधीही एका सिक्रेट ट्रीपचे फोटो व्हायरल झाले होते.

'लाखों दिलों की धडकन' Team India ची स्टार फलंदाज स्मृती मानधना 'या' सेलिब्रिटीला करतेय डेट? टॅटूमुळे गुपित उघड झाल्याच्या चर्चा
Smriti Mandhana Dating: महिला विश्वचषक २०२२ सध्या न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार फलंदाजी केली. तिने १२३ धावांची शानदार खेळी करून दाखवली. त्यामुळे गेले काही दिवस तिला सोशल मीडियावर खूप सर्च केलं जात आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. तशातच आता स्मृती मानधना एका सेलिब्रिटीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
स्मृती मानधना तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिने महिला विश्वचषकात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. ती सोशल मीडियावर बरेच वेळा ट्रेंड करत असते. तिचा चाहतावर्ग तर आहेच पण त्यासोबतच ती अनेकांची क्रश देखील आहे. पण 'लाखों दिलों की धडकन' असलेली स्मृती मानधना मात्र एका सेलिब्रिटीला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध संगीतकाराने आपल्या हातावर SM18 टॅटू काढल्यानंतर अनेकांनी त्याचा संबंध थेट स्मृती मानधनाशी जोडला. त्या सेलिब्रिटीचं म्हणजेच संगीतकाराचे नाव आहे पलाश मुच्छल (Palaash Mucchal). स्मृती मानधनाच्या जर्सीचा क्रमांक १८ आहे. त्यामुळे पलाशच्या हातावरील SM18 नावाच्या टॅटूचा संबंध लावला जात आहे.
पण, केवळ तो टॅटू हेच या चर्चेचं कारण नाहीये. याआधी देखील स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल सोबत अनेकदा दिसले आहेत. मसूरी येथे हे दोघे एकत्र असल्याचे फोटोज व्हायरल झाले होते. त्याबरोबरच स्मृतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पलाशने पोस्ट केलेल्या फोटोवरूनही चर्चा रंगली होती. स्मृती मानधना अनेक वेळा पलाश मुच्छालसोबत दिसली आहे.
गेल्या वेळी जेव्हा पलाश मुच्छालचे नवीन गाणे रिलीज झाले होते, तेव्हा स्मृती मानधनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे प्रमोशन केले होते. त्याच वेळी एका सुप्रसिद्ध शो दरम्यान स्मृती मानधनाला पलाश मुच्छाल संबंधित प्रश्न विचारण्यात आला. स्मृती मानधनाला विचारण्यात आलं होतं की, पलाश स्मृती मानधनासाठी इतका स्पेशल का आहे? असं विचारलं जातंय, त्याच उत्तर काय... त्यावेळी स्मृतीने उघडपणे उत्तर देणं टाळलं होतं.