रणबीरच्या सहवासात माणुसकी वाढते - दीपिका

By Admin | Updated: November 14, 2015 14:34 IST2015-11-14T14:34:54+5:302015-11-14T14:34:54+5:30

रणबीर कपूरच्या सोबत काम करण्यात प्रचंड मजा येतेच असं सांगताना दीपिका पदुकोणने त्याच्या सहवासामुळे माणूस म्हणून आपला चांगला विकास होतो असं मत व्यक्त केलं

Humanity rises with Ranbir - Deepika | रणबीरच्या सहवासात माणुसकी वाढते - दीपिका

रणबीरच्या सहवासात माणुसकी वाढते - दीपिका

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - रणबीर कपूरच्या सोबत काम करण्यात प्रचंड मजा येतेच असं सांगताना दीपिका पदुकोणने त्याच्या सहवासामुळे माणूस म्हणून आपला चांगला विकास होतो असं मत व्यक्त केलंय.
आठ वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिका व रणबीरचं प्रेमकरण चांगलंच गाजलेलं होतं. नंतर मात्र त्यांचं बिनसलं आणि निव्वळ मैत्री उरली. बचना ए हसीनो, यह जवानी है दिवानी या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेली ही जोडी आता इम्तियाझ अलीच्या तमाशात एकत्र झळकत आहे.
गेल्या ८ वर्षांमध्ये रणबीर खूप बदलला असून झालेला बदल चांगला आहे असं दीपिका सांगते. त्याच्याबरोबर काम करताना माणूस म्हणूनप्रगती होते तसंच कलाकार म्हणूनही खूप काही शिकायला मिळतं असा दीपिकाचा अनुभव आहे. तमाशा २७ नोव्हेंबर रोजी रीलीज होत आहे.

Web Title: Humanity rises with Ranbir - Deepika