धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:19 IST2026-04-10T13:17:19+5:302026-04-10T13:19:56+5:30

वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतल्याने सर्वांना धक्का बसलाय. अभिनेत्याच्या निधनामागचं कारणही समोर आलंय

Game of Thrones actor Michael Patrick dies at 35 after prolonged illness | धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा

धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा

हॉलिवूडची गाजलेली मालिका 'गेम ऑफ थ्रोन्स' (Game of Thrones) मधील आपल्या अभिनयाने ओळख मिळवणारा अभिनेता मायकेल पॅट्रिक (Michael Patrick) याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक काळापासून तो 'मोटर न्यूरॉन डिसीज' या प्रदीर्घ आजाराशी झुंज देत होता, मात्र शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली.

मायकेल पॅट्रिकच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हॉलिवूड चित्रपटसृष्टीत आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मायकेलने 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये बर्फात राहणाऱ्या एका सैनिकाची महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेव्यतिरिक्त त्याने अनेक ब्रिटिश टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तो केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हता, तर पडद्यामागे एक अत्यंत दिलखुलास व्यक्ती म्हणूनही ओळखला जायचा.

त्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, मायकेल हा एक अत्यंत लढवय्या कलाकार होता. आजारपणामुळे शारीरिक त्रास होत असतानाही त्याने कलेप्रती आपली निष्ठा कायम ठेवली होती. सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याला श्रद्धांजली अर्पण करत असून, इतक्या कमी वयात एका प्रतिभासंपन्न कलाकाराने जगाचा निरोप घेतल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मायकेलच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'मोटर न्यूरॉन डिसीज' या प्रदीर्घ आजारपणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक आयुष्यापासून लांब होता, मात्र त्याच्या कामाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या स्मरणात राहील. मायकेलच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : गेम ऑफ़ थ्रोन्स अभिनेता माइकल पैट्रिक का 35 वर्ष की आयु में निधन

Web Summary : 'गेम ऑफ़ थ्रोन्स' के लिए जाने जाने वाले माइकल पैट्रिक का मोटर न्यूरॉन रोग से जूझने के बाद 35 वर्ष की आयु में निधन हो गया। ब्रिटिश टीवी शो में अपनी भूमिकाओं के लिए जाने जाने वाले अभिनेता के प्रतिभा और भावना के लिए प्रशंसक और सहयोगी शोक में हैं।

Web Title : Game of Thrones Actor Michael Patrick Dies at 35

Web Summary : Michael Patrick, known for 'Game of Thrones,' passed away at 35 after battling Motor Neurone Disease. The actor, known for his roles in British TV shows, is mourned by fans and colleagues for his talent and spirit.