Filmfare OTT Awards 2025: 'ही' ठरली सर्वोत्कृष्ट वेबसीरिज; तर 'हा' ठरला ओटीटी स्टार, बघा विजेत्यांची संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:27 IST2025-12-16T13:26:40+5:302025-12-16T13:27:18+5:30
फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांची घोषणा झाली. जाणून घ्या ओटीटीविश्वातील कोणत्या कलाकृतींना गौरवण्यात आलं

Filmfare OTT Awards 2025: 'ही' ठरली सर्वोत्कृष्ट वेबसीरिज; तर 'हा' ठरला ओटीटी स्टार, बघा विजेत्यांची संपूर्ण यादी
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२५' (Filmfare OTT Awards 2025) सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा झाली. ओटीटी विश्वातील या दिमाखदार सोहळ्या अनेक कलाकारांना मानाची 'ब्लॅक लेडी' देऊन सन्मानित करण्यात आले. जाणून घ्या कोणाला कोणते पुरस्कार मिळाले
मुख्य विजेते (सीरिज):
सर्वोत्कृष्ट सीरिज: ब्लॅक वॉरंट
सर्वोत्कृष्ट सीरिज (समीक्षक): पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (सीरिज): विक्रमादित्य मोटवाने, सत्यंशु सिंग आणि टीम (ब्लॅक वॉरंट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (सीरिज - पुरुष): जयदीप अहलावत – पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट अभिनेता (कॉमेडी सीरिज - महिला): अनन्या पांडे – कॉल मी बे
सर्वोत्कृष्ट अभिनेता (कॉमेडी सीरिज - पुरुष): वरुण सोबती (रात जवां है) आणि स्पर्श श्रीवास्तव (दुपैय्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सीरिज - महिला): तिलोत्तमा शोमे – पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सीरिज - पुरुष): राहुल भट – ब्लॅक वॉरंट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सीरिज - महिला): मोनिका पनवार– खौफ
वेब ओरिजिनल फिल्म विभागातील विजेते:
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल फिल्म: गर्ल्स विल बी गर्ल्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (फिल्म): अभिषेक बॅनर्जी– स्टोलन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फिल्म): सान्या मल्होत्रा – मिसेस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (फिल्म): शुची तलाती – गर्ल्स विल बी गर्ल्स
याव्यतिरिक्त, 'खौफ' या सीरिजने सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, आणि व्हिएफएक्स सारख्या तांत्रिक पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले. जयदीप अहलावत आणि अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय कपूर कुटुंबातील उगवता स्टार जहान कपूरच्या 'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिजचा फिल्मफेअरमध्ये दबदबा दिसला.