'कॅप्टन मिलर' मध्ये धनुषचा थरार; चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 05:22 PM2023-09-26T17:22:49+5:302023-09-26T17:23:26+5:30

'कॅप्टन मिलर' चित्रपटातून धनुष चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ डिसेंबर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Dhanush's thrill in 'Captain Miller'; On 'this' day will come to meet the audience | 'कॅप्टन मिलर' मध्ये धनुषचा थरार; चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

Dhanush

googlenewsNext

धनुषला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार मानले जाते. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढा मोठा सुपरस्टार असूनही हा अभिनेता त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. 'कॅप्टन मिलर' चित्रपटातून धनुष चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ डिसेंबर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'कॅप्टन मिलर' चित्रपटामध्ये धनुषचा रावडी लूक आहे. धनुष एका स्वत्रंत्र सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट स्वातंत्रपूर्व काळातील आहे. या चित्रपटामध्ये ब्रिटिशांविरोधातील लढा दाखविण्यात येणार आहे. कॅप्टन मिलर हा ब्रिटीश सैन्याच्या दृष्टीने एक गुन्हेगार आहे. 


'कॅप्टन मिलर' हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास 90 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगूमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. याआधी धनुषने बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे. आनंद एल राय यांचा 'अतरंगी रे' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. याआधी तो 'शमिताभ' आणि 'रांझना' सारख्या चित्रपटातही दिसला.

अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अरुण माथेस्वरन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी त्यांनी 'रॉकी' आणि 'सानी कायधाम' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. धनुष व्यतिरिक्त चित्रपटात सुदीप किशन, नस्सर, एलांगो कुमारवेल, एडवर्ड सोनेनब्लिक, विजी चंद्रशेखर, निवेदिता सतीश, जॉन कोकेन, विनोथ किशन, बाला सरवणन, सुमेश मूर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: Dhanush's thrill in 'Captain Miller'; On 'this' day will come to meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.