अभिनेत्री क्रिती सनॉनची बॉलिवूडमध्ये दशकपुर्ती, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला 'हा' यशाचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 09:34 AM2024-05-24T09:34:57+5:302024-05-24T09:35:28+5:30

अभिनेत्री क्रिती सनॉनला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल १० वर्षे झाली आहेत.

decade in Hindi Film Industry : Kriti Sanon celebrates 10 years in Bollywood: Drops Inspiring Video | अभिनेत्री क्रिती सनॉनची बॉलिवूडमध्ये दशकपुर्ती, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला 'हा' यशाचा कानमंत्र

अभिनेत्री क्रिती सनॉनची बॉलिवूडमध्ये दशकपुर्ती, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला 'हा' यशाचा कानमंत्र

'हिरोपंती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे क्रिती सनॉन.  अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल १० वर्षे पुर्ण झाली आहेत. क्रिती सनॉनने फारच कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत क्रिती सनॉनने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ती आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.  या दशकपूर्तीनिमित्त सोशल मीडियात ती ट्रेंड करते आहे. चाहतेही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

बॉलिवूडमध्ये एक दशक पूर्ण होताच क्रितीनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिनं किती मेहनत घेतली, हे दिसून येत आहे.  या व्हिडीओमध्ये तिच्या चित्रपटातील अनेक सीनही पाहायला मिळत आहेत. 

क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर पाऊल ठेवलं. तेव्हा असं वाटलं होतं की हीच ती गोष्ट आहे जी मला करायची आहे. यासाठी मी बनली आहे. काळ किती लवकर सरला. असं वाटतं ती कालचीच गोष्ट आहे. या काळात मी खूप काही शिकले आहे, एक अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून विकसित झाले.  काही सुंदर मित्रांना भेटले आणि खास आठवणी निर्माण झाल्या. ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य येईल. माझ्या प्रवासाचा भाग राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे'.

यासोबतच अभिनेत्रीनेही पाठिंब्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले.  एवढंच नाही तर क्रितीनं तिच्या चाहत्यांना यशाचा मंत्र दिलाय.  "मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा, जीव ओतून मेहनत करा, हरलात तरी पुन्हा प्रयत्न करा,  कारण जर मी हे करू शकले तर तुम्हीही करू शकता. आणि हो सर्वोत्तम अजून येणं बाकी आहे'. क्रितीच्या पोस्टवर सेलिब्रिटीसह तिच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन करत प्रेमाचा भरभरुन वर्षाव केलाय. 
 

Web Title: decade in Hindi Film Industry : Kriti Sanon celebrates 10 years in Bollywood: Drops Inspiring Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.