भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:46 IST2025-12-21T09:39:34+5:302025-12-21T09:46:15+5:30
कॉमेडियन भारती सिंगला पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा, अभिनेत्री म्हणाली- ''मला मुलगी हवीये...''

भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग १९ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा आई झाली. पहिला मुलगा गोलाच्या जन्मानंतर भारतीने पुन्हा एकदा मुलाला जन्म दिला. भारती सिंग दुसऱ्या मुलाला प्रेमाने 'काजू' म्हणते. दुसऱ्यांदा आई झाल्याचा आनंद गगनात मावेनासा असला तरी, भारतीला पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका हॉस्पिटल व्लॉगमध्ये तिने आपल्या याविषयी खुलासा केला आहे. काय म्हणाली भारती?
मुलीची इच्छा कायम:
भारती सिंगने हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, तिला सुरुवातीपासूनच मुलगी हवी होती. पहिल्या मुलाच्या (गोला) वेळी आणि आताही तिने मुलीच्या आशेने गुलाबी रंगाचे कपडेही आणले होते. भारती म्हणाली, "मला मुलगा झाला याचा आनंद आहेच, पण मुलगी असती तर मजा आली असती. त्यामुळे मला मुलीची आशा आहे. जर हर्षने साथ दिली, तर आम्ही तिसऱ्या बाळाचा विचार करू शकतो."
हर्षची मजेशीर प्रतिक्रिया
भारतीच्या या विधानावर तिचा पती हर्ष लिंबाचियाने मजेशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "तिसरं बाळ सुद्धा मुलगाच झाला तर?" त्यावर भारती हसून म्हणाली, "जर तिसराही मुलगा झाला, तर मी माझे स्वतःचे केस उपटून घेईन आणि टक्कल करेन." हर्षने पुढे भारतीला समजावत म्हटले की, तिला पुन्हा त्रास द्यावा अशी त्याची इच्छा नाही आणि एका पत्नीला दोन मुलं असणं पुरेसं आहे.
याच व्लॉगमध्ये भारतीने प्रसूतीपूर्वीचा अनुभवही सांगितला. १८ डिसेंबरच्या रात्रीपासूनच तिला अस्वस्थ वाटत होते आणि १९ तारखेच्या सकाळी अचानक तिला मोठा त्रास सुरु झाला. घाबरलेल्या स्थितीत ती हर्षसोबत रुग्णालयात पोहोचली आणि काही तासांतच तिने गोंडस मुलाला जन्म दिला. सिझेरियन ऑपरेशनमुळे ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
भारती पुन्हा आई झाल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा हिने तिला खास भेट पाठवली आहे. मलाईकाने भारतीसाठी केक आणि कुकीज पाठवून तिचे अभिनंदन केले. मलायकाने पाठवलेले गिफ्ट हर्षने तिच्या व्लॉगमध्ये दाखवले आहेत. भारती आणि हर्षच्या या दुसऱ्या मुलाच्या आगमनाने लिंबाचिया कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. भारती