रिअल लाइफ कपल चित्रपटातही एकत्रित

By Admin | Updated: March 7, 2016 02:32 IST2016-03-07T02:32:50+5:302016-03-07T02:32:50+5:30

चित्रपट असो या मालिका, या क्षेत्रातील रिअल लाइफ कपलची इच्छा असतेच की, पडद्यावरदेखील एकत्रित झळकावे. ही इच्छा सध्या पूर्ण झाली आहे

Combined in Real Life Kapl | रिअल लाइफ कपल चित्रपटातही एकत्रित

रिअल लाइफ कपल चित्रपटातही एकत्रित

चित्रपट असो या मालिका, या क्षेत्रातील रिअल लाइफ कपलची इच्छा असतेच की, पडद्यावरदेखील एकत्रित झळकावे. ही इच्छा सध्या पूर्ण झाली आहे. ती सौरभ गोखले व अनुजा साठे या क्युट कपलची. ही रिअल लाइफ जोडी आता रिल कपल म्हणूनदेखील झळकणार आहे. योद्धा, शिनमा, परतु या सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या सौरभ गोखले व सध्या गाजत असलेल्या तमन्ना या मालिकेत हटके भूमिका साकारणारी अनुजा साठे ही जोडी एका चित्रपटात पहिल्यांदाच आॅनस्क्रीन दिसणार आहेत. लग्नानंतर प्रथमच अभिनेता सौरभ गोखले व त्याची पत्नी अनुजा या चित्रपटात एकत्र येणार आहेत, तसेच या चित्रपटात प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले या तगड्या लाकारांचादेखील समावेश अहे. चला तर या रिअल लाइफ जोडीची रिल लाइफ केमिस्ट्री पाहण्यासाठी थोडी वाट पाहू यात.

Web Title: Combined in Real Life Kapl