Chhaava: हाईटच झाली...! एकाच थिएटरमध्ये छावाचे बॅक-टू-बॅक ३६ शो; आहेत तरी किती स्क्रीन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:44 IST2025-02-19T09:42:13+5:302025-02-19T09:44:25+5:30

Chhaava box office collection, Movie News:तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने पाच दिवसांत १६५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सोमवारी पहिल्यांदाच छावाच्या तिकीट विक्रीत ५० टक्क्यांची घट झाली होती.

Chhaava Movie News: It's a hit...! 36 back-to-back shows of Chhaava in a single theater city pride Kothrud; how many screens are there.... | Chhaava: हाईटच झाली...! एकाच थिएटरमध्ये छावाचे बॅक-टू-बॅक ३६ शो; आहेत तरी किती स्क्रीन....

Chhaava: हाईटच झाली...! एकाच थिएटरमध्ये छावाचे बॅक-टू-बॅक ३६ शो; आहेत तरी किती स्क्रीन....

छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कल्ला करत बराच गल्ला जमविला आहे. चौथ्या दिवशीच सिनेमाने आपला खर्च वसूल केला आहे. थिएटरनीही ही संधी सोडलेली नाहीय. पुण्यातील सातारा रोडच्या सिटी प्राईडमध्ये रविवारी २४ तास शो ठेवण्यात आलेले होते. त्याहून पुढची हाईट झाली आहे. एका थिएटरने छावाचे बॅक-टू-बॅक ३६ शो आयोजित केले आहेत. 

कोथरुडच्या सिटी प्राईडमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री ११.१५ वाजेपर्यंत शो ठेवण्यात आले आहेत. या थिएटरमध्ये ८ स्क्रीन आहेत. यामुळे त्यांना हे शक्य झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत आठ शो ठेवण्यात आले आहेत. १५ मिनिटे, अर्धा तास अशा फरकाने हे शो ठेवण्यात आले आहेत. यानंतरच्या प्रत्येक तीन तासांच ८ शो ठेवण्यात आले आहेत. 

तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने पाच दिवसांत १६५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सोमवारी पहिल्यांदाच छावाच्या तिकीट विक्रीत ५० टक्क्यांची घट झाली होती. महाराष्ट्रात हे शो हाऊस फुल होत आहेत. अनेकांना मिळेल ती सीट घ्यावी लागत आहे. 

विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट मराठा साम्राज्याचे राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

पहिला दिवस (शुक्रवार) ३१ कोटी
दुसरा दिवस (शनिवार) - ३७ कोटी
दिवस ३ (रविवार) - ४८.५ कोटी
दिवस ४ (सोमवार): ₹२४ कोटी
एकूण संकलन (४ दिवस) १४०.५० कोटी

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे आणि लवकरच तो २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो.

Web Title: Chhaava Movie News: It's a hit...! 36 back-to-back shows of Chhaava in a single theater city pride Kothrud; how many screens are there....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.