'धुरंधर'च्या दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:17 IST2025-12-12T13:09:40+5:302025-12-12T13:17:48+5:30
आदित्य धर लिखित, दिग्दर्शित धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला.

'धुरंधर'च्या दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला...
Aditya Dhar On Sara Arjun: आदित्य धर लिखित, दिग्दर्शित धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या ७ दिवसांनंतर सुद्धा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू कायम आहे. सत्य घटनांवर आधारीत हा सिनेमा प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी खेचण्यास यशस्वी झाला आहे. सध्या सोशल मीडियासह चाहत्यांमध्ये या चित्रपटाबरोबर त्यातील कलाकारांचीही तितकीच चर्चा होताना दिसतेय. एकीकडे धुरंधरची सगळीकडे क्रेझ असताना निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. 'धुरंधर' सिनेमाचा पुढील भाग १९ मार्च २०२६ ला भेटीला येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात 'धुरंधर'ची कथा कशी वळण घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
अशातच धुरंधरच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री सारा अर्जुन असणार की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. आता याबद्दल दिग्दर्शकाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे अभिनेत्री सारा अर्जुन दुसऱ्या भागातही दिसणार की नाही, याची हिंट दिली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त , अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.त्यासोबत धुरंधरच्या दुसऱ्या पार्टमध्ये सारा अर्जुनच्या एन्ट्रीवरही शिक्कामोर्तब झाला आहे.

अलिकडेच सारा अर्जुनने दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला भावुक असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये, "गोल्डन हार्टवाला धुरंधर... ", असं म्हणत साराने तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटात आदित्यने पूर्ण पाठिंबा दिला आणि सेटवर सुरक्षित वातावरण निर्माण केलं, असं तिने म्हटलंय." पुढे सारा म्हणाली, "आदित्यकडे अनुभव आहेच शिवाय तो खूप समजुतदार आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा अहंकार नाही. तो संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवतो आणि प्रत्येक कलाकाराचं मनोबळ वाढवतो. "
आदित्य धर काय म्हणाला?
सारा अर्जुनची ही पोस्ट पाहून त्यावर आपली प्रतिक्रिया देत आदित्यने म्हटलंय, "सारा, तुझा मेसेज वाचून मी खूप भावूक झालो. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवल्याबद्दल आणि 'धुरंधर'साठी तुझे खूप खूप आभार. त्यानंतर आदित्यने नकळतपणे धुरंधरमधील दुसऱ्या भागात सारा अर्जुन असल्याचं स्पष्ट केलं आहे. धुरंधरच्या दुसऱ्या भागामध्ये जग तुझ्यातील कौशल्य पाहिल आणि मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे."
शिवाय आदित्यने या पोस्टमध्ये साराचं भरभरुन कौतुकही केलं आहे."इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्री बनण्याची सर्व क्षमता तुझ्यामध्ये आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव,आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी एक वारसा मागे ठेवण्यासाठी येथे आहोत, म्हणून कधीही आपल्या कामाशी तडजोड करू नकोस...", अशी प्रतिक्रिया आदित्यने साराच्या या पोस्टवर दिली आहे.