'तू ब्रेस्ट सर्जरी करुन घे'; करिअरच्या सुरुवातीला Ananya Panday ला मिळाला होता सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:07 IST2022-06-02T14:04:40+5:302022-06-02T14:07:10+5:30
Ananya panday:काही दिवसांपूर्वी स्ट्रगल लाइफविषयी बोलणाऱ्या अनन्याने यावेळी बॉडीशेमिंगविषयी भाष्य केलं आहे. तिच्या फिगरवरुन अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं.

'तू ब्रेस्ट सर्जरी करुन घे'; करिअरच्या सुरुवातीला Ananya Panday ला मिळाला होता सल्ला
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे (Ananya Panday) हिचा अन्य स्टारकिड्सप्रमाणे कलाविश्वात प्रवेश झाला आहे. अनन्या अनेकदा तिच्या अभिनयापेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. यात बऱ्याचदा तिच्या फॅशनमुळे वा तिच्या वायफळ वक्तव्यांमुळे तिला ट्रोल व्हावं लागतं. काही दिवसांपूर्वी स्ट्रगल लाइफविषयी बोलणाऱ्या अनन्याने यावेळी बॉडीशेमिंगविषयी भाष्य केलं आहे. तिच्या फिगरवरुन अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं. इतकंच नाह तर ब्रेस्ट सर्जरी करुन घे असा सल्लाही तिला देण्यात आल्याचं तिने म्हटलं आहे.
अलिकडेच अनन्याने 'द रणवीर शो'मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने कलाविश्वात तिला कशा प्रकारचा अनुभव आला हे सांगितलं. यात सुरुवातीच्या काळात तिला सेक्सिझ्मचा सामना करावा लागला असंही तिने सांगितलं.
"लोकांनी मला चेहरा, शरीरी इतकंच नाही तर बूब जॉब करण्याचाही सल्ला दिला होता. त्यांचे हे सल्ले मला खरच फार त्रासदायक वाटायचे. मी करिअर स्टार्ट केलं त्याचवेळी काही जणांनी मला थेट, तर काहींनी सहज बोलता बोलता मला हे सल्ले दिले होते. पण, त्यांचा त्यामागील हेतू मला बरोबर कळत होता", असं अनन्या म्हणाली.
पुढे ती म्हणते, "ते लोक मला कायम म्हणायचे, तुला वजन वाढवण्याची गरज आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या शरीरावरुन ट्रोल करते त्यावेळी ती सगळ्यात वाईट गोष्ट असते."
दरम्यान, अनन्या करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती काही मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली. मात्र, अद्यापही म्हणावी तशी तिची लोकप्रियता निर्माण झालेली नाही. अनन्या लवकरच विजय देवरकोंडासोबत 'लायगर' या चित्रपटात झळकणार आहे.