​परिणीती चोप्राच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’ कोण? जाणून घ्यायचे तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 11:07 IST2017-04-21T05:37:40+5:302017-04-21T11:07:40+5:30

सुमारे तीन वर्षांच्या ब्रेकनंतर परिणीती चोप्रा ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतत आहे. गत तीन वर्षांत परिणीतीने ...

Who is the 'Mystery Man' in Parineeti Chopra's life? Read on to know! | ​परिणीती चोप्राच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’ कोण? जाणून घ्यायचे तर वाचा!

​परिणीती चोप्राच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’ कोण? जाणून घ्यायचे तर वाचा!

मारे तीन वर्षांच्या ब्रेकनंतर परिणीती चोप्रा ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतत आहे. गत तीन वर्षांत परिणीतीने स्वत:वर बरीच मेहनत घेतली. वजन कमी करण्यासोबतच खासगी आयुष्यातील तिने बदल स्वीकारला. त्याचे परिणाम आताश: दिसू लागले आहेत. होय, परिणीती नव्याने प्रेमात पडल्याची खबर आहे. परिणीती एका अस्टिस्टंट डायरेक्टरला डेट करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात बॉलिवूडमध्ये सुरु होती. पण हा मिस्ट्री मॅन कोण, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. होय, परिणीती करण जोहरचा अस्टिस्टंट डायरेक्टर चरित देसाई याला डेट करतेय.



ALSO READ : परिणीती चोप्राचे गाणे ऐकून चक्क झोपी गेली ‘गोलमाल4’ टीम!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चरित हा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करतो. गतवर्षी ‘ड्रिम टिम टूर’दरम्यान परिणीती आणि चरित या दोघांची ओळख झाली. या टूरचे बिहार्इंड द सीन्स व्हिडिओ शूट करण्याची जबाबदारी चरितकडे सोपवण्यात आली होती. याचदरम्यान चरित आणि परी यांची मैत्री जमली. भारतात परतल्यानंतरही ही मैत्री कायम राहिली आणि पुढे इतकी बहरली की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
अलीकडे एका मुलाखतीत परिणीतीने याबाबत अप्रत्यक्ष बोलून गेली. पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही लाईफमध्ये मोठ्या बदलांना सामोरे जात असतानाच जीवनात ब्रेक आला, असे परिणीती म्हणाली. परिणीतीचे हे वाक्य बरेच काही सांगणारे आहे. परिणीती दीर्घकाळ मनीष शर्मा (यश राज फिल्म्सचा डायरेक्टर)सोबत रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपमधून परिणीती आता सावरली आहे. तिच्या आयुष्यात नवे प्रेम आले आहे, तसेच नव नव्या आॅफर्सही तिच्याकडे आहेत. यापेक्षा दुसरे काय हवे?

Web Title: Who is the 'Mystery Man' in Parineeti Chopra's life? Read on to know!