कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:42 IST2025-04-25T13:41:46+5:302025-04-25T13:42:30+5:30

कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत जोडी? जाणून घ्या.

Who Is The Richest Couple Of Bollywood property and total net worth will blow your mind | कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!

कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!

Richest Couple Of Bollywood : बॉलिवूड म्हणजे झगमगाटी विश्व. या चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या लोकांनाही ग्लॅमरस दिसण्यासाठी आणि राहण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. बॉलिवूडच्या अनेक कलाकार  जोड्या अतिशय आलिशान आयुष्य जगतात. त्यांचं राहणीमान इतकं गर्भश्रीमंत आहे की, सामान्य माणूस त्याची कल्पनाही करू शकणार नाही. सामान्य प्रेक्षक आपल्या आवडत्या जोड्यांना मोठ्या पडद्यावर बघून नेहमीच खूश होत असतो. कोट्यवधींची कमाई करण्याऱ्या या कलाकारांच्या आयुष्यात काय काय घडते याकडेही चाहत्यांचे बारीक लक्ष असते. जाहिराती, सीरिज, चित्रपट करून कलाकार खोऱ्याने पैसा कमवतात. पण, बॉलिवूडची सर्वाधिक श्रीमंत जोडी कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया...

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण
बॉलिवूडच्या आदर्श जोडप्यांमध्ये गणले जाणारे दीपिका आणि रणवीर हे नेटवर्थच्या बाबतीतही सगळ्यांना टक्कर देतात. बॉलिवूडचं हे कपल अतिशय आलिशान आयुष्य जगतं. रणवीर आणि दीपिका तब्बल ११९ कोटींच्या आलिशान घरात राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्याकडे एकूण ७४५ कोटींची संपत्ती आहे.


सैफ अली खान-करीना कपूर
‘सैफिना’ जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर हे देखील बॉलिवूडच्या श्रीमंत जोड्यांपैकी एक आहेत. दोघांकडे मिळून एकूण १६८५ कोटींची संपत्ती आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार एकटा सैफ १२०० कोटींचा मालक आहे. तर, सीएनबीसी टीव्ही१८च्या रिपोर्टनुसार, करीना कपूरकडे ४८५ कोटींची संपत्ती आहे.


शाहरुख खान-गौरी खान
बॉलिवूडची सगळ्यात रोमँटिक जोडी म्हणजे ‘किंग’ शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान. शाहरुख खान याने आपल्या अभिनयाने मोठा पडदा गाजवला, तर गौरीने देखील इंटेरियर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रातून खूप पैसा कमवतात. जीक्यूच्या रिपोर्टनुसार, शाहरुख आणि गौरी खान या जोडीचे एकूण नेटवर्थ ८०९६ कोटी रुपये आहे. तर, लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, गौरी खान १६०० कोटींची मालकीण आहे.


अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना
बॉलिवूडच्या श्रीमंत जोड्यांमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या जोडीचा देखील समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार २५०० कोटींचा मालक तर, ट्विंकल खन्ना ३५० कोटींची मालकीण आहे. दोघांची एकूण संपत्ती तब्बल २८५० कोटींची आहे.


Web Title: Who Is The Richest Couple Of Bollywood property and total net worth will blow your mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.