watch pics : ​‘बाहुबली2’चे ६१३ दिवस आणि शूटींग संपले...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 14:48 IST2017-01-11T14:48:34+5:302017-01-11T14:48:34+5:30

‘आखिर कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सूक आहे. येत्या एप्रिलमध्ये या प्रश्नाचे उत्तर ...

watch pics: Bahubali2's 613 days and shooting ended ... !! | watch pics : ​‘बाहुबली2’चे ६१३ दिवस आणि शूटींग संपले...!!

watch pics : ​‘बाहुबली2’चे ६१३ दिवस आणि शूटींग संपले...!!

खिर कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सूक आहे. येत्या एप्रिलमध्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. होय, येत्या एप्रिलमध्ये ‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे शूटींग अलीकडेच संपले. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक  एसएस राजमौली यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी ‘बाहुबली’ अर्थात चित्रपटाचा हिरो प्रभास याची तोंडभरून स्तुती केलीय.





राजमौली यांनी लिहिलेयं,‘आज ‘बाहुबली’च्या शूटींगचा अखेरचा दिवस होता. प्रगत साडे तीन वर्षांपासून प्रभास या चित्रपटाशी जुळून आहे. हे साडे तीन वर्षे एक विलक्षण अनुभव आहे. प्रभासला या चित्रपटाबद्दल प्रचंड विश्वास होता. इतका विश्वास कदाचित अन्य कुणाला असेल.’
राजमौली यांच्या या पोस्टला प्रभासनेही उत्तर दिलेयं. त्याने लिहिलेय, पाच वर्षांपूर्वी ‘बाहुबली’चे शूटींग सुरु झाले. या चित्रपटात काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक अद्भूत अनुभव आहे. हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. मला या चित्रपटात संधी दिल्याबद्दल राजमौली गुरु, शोभू गुरू आणि प्रसाद गुरु यांचे आभार. माझ्या प्रिय सहकलाकरांनाही मी धन्यवाद देईल. शिवाय मला आणि या चित्रपटावर अतोनात प्रेम करणाºया चाहत्यांचेही मी आभार मानेल. तुम्हा सगळ्यांशिवाय काहीही शक्य नव्हते. तुम्हा सगळ्यांना प्रेम.





प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली2’चे शूटींग ६१३ दिवस चालले. प्रभासने हैदराबादेत या चित्रपटाचा शेवटचा सीन शूट केला. यानंतर राजमौली यांनी चित्रपटाच्या रॅप-अपची बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

रॅप-अपदरम्यानचे अनेक फोटो टीमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेव्हा बघूयात...!!





Web Title: watch pics: Bahubali2's 613 days and shooting ended ... !!