Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:30 IST2025-03-14T15:47:51+5:302025-03-14T16:30:37+5:30
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान हे काय? तमन्ना आणि विजयला चाहत्यांचा प्रश्न

Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी
आज सगळीकडे धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सगळेच वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. सेलिब्रिटींच्या घरीही होळी पार्टी रंगली आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या घरी होळी पार्टीसाठी तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) पोहोचली. तोच पाठोपाठ अभिनेता विजय वर्माही (Vijay Varma) रवीना टंडनच्या घरी जात असल्याचं पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. ब्रेकअपच्या चर्चांनंतर विजय आणि तमन्ना चक्क एकत्रच होळी साजरी करत आहेत. यावरुन त्यांचं पॅचअप झालं का अशीही चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रिटी पेजेसवरन व्हिडिओ व्हायरल होत आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा रवीना टंडनच्या घरी होळी पार्टीसाठी पोहोचले आहेत. दोघंही एकत्र आलेले नाहीत तर वेगवेगळ्या वेळी पोहोचले आहेत. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघंही एकत्रच होळी साजरी करत असल्याने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांचं परत पॅचअप झालं का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. मात्र अद्याप दोघांकडून या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. तमन्ना आणि विजय दोघंही रवीना टंडनची लेक राशाच्या जवळचे आहेत. राशानेच दोघांना होळी पार्टीचं आमंत्रण दिलं. त्यामुळे तिच्यासाठी दोघं एकत्र आल्याचा अंदाज आहे.