दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट मागणीवर विद्या बालनने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मी स्वत:..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:15 IST2025-07-22T14:14:51+5:302025-07-22T14:15:09+5:30
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या शिफ्ट टायमिंगचा वाद चर्चेत आहे.

दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट मागणीवर विद्या बालनने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मी स्वत:..."
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या शिफ्ट टायमिंगचा वाद चर्चेत आहे. दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) लेक जन्माला आल्यानंतर ८ तासच काम करणार अशी अट ठेवली. संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' सिनेमासाठी तिने ही अट ठेवली होती. वांगा यांनी मात्र तिची मागणी नाकारत तिला सिनेमातून काढलं. या वादावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी दीपिकाची बाजू घेतली आहे. आता अभिनेत्री विद्या बालननेही (Vidya Balan) या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालन म्हणाला, "आजकाल प्रत्यक्ष क्षेत्रात महिलांच्या शिफ्टमध्ये सूट दिली जात आहे. मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये का मागे राहील? एका आईला काम आणि कुटुंब यात ताळमेळ साधावा लागतो. त्यामुळे कामाच्या तासांमध्ये सवलत दिलीच पाहिजे."
विद्या अजून आई झालेली नाही. पण तरी तिला ही अट योग्य वाटते. ती म्हणते, "मी स्वत: १२ तास शिफ्ट करायला तयार असते. कारण माझ्यावर कोणतीही कौटुंबिक जबाबदारी नाही. प्रत्येक महिलेची परिस्थिती वेगळी असते आणि खास करुन आई झाल्यानंतर स्त्रीच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यात बदल होतो. प्रत्येकाने ते समजलं पाहिजे."
या मुद्द्यावर काजोल आणि सोनाक्षी सिन्हानेही दीपिकाला समर्थन दिलं होतं. तर दुसरीकडे कबीर खानने अक्षय कुमार आणि आमिर खानही ८ च तास काम करतात अशी प्रतिक्रिया दिली होती. फिल्म इंडस्ट्रीत १२ तासांची शिफ्ट ही सामान्य असते. मात्र आता कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच कलाकारांनीही कामाच्या वेळांमध्ये सवलत दिली पाहिजे अशी मागणी होत आहे.