आमिर खान अन् फातिमाचा पिकलबॉल खेळताना Video व्हायरल, नेटकरी म्हणतात, "मम्मी नंबर.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 16:20 IST2023-05-24T16:19:47+5:302023-05-24T16:20:43+5:30
आमिर खान आणि फातिमा सना शेख दोघांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते.

आमिर खान अन् फातिमाचा पिकलबॉल खेळताना Video व्हायरल, नेटकरी म्हणतात, "मम्मी नंबर.."
अभिनेता आमीर खान सध्या (Aamir Khan) मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. 'लाल सिंह चड्डा' फ्लॉप झाला आणि आमिर खानने सिनेमांमधून विश्रांती घेतली. नुकताच तो नेपाळच्या विपश्यना केंद्रातही जाऊन आला. सध्या तो कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहे. आमिरचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आमिर आणि 'दंगल' फेम फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) 'पिकलबॉल' खेळताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दोघांची चांगलीच टर खेचली आहे.
आमिर खान आणि फातिमा सना शेख दोघांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते. फातिमा मुळेच आमिर आणि किरण रावचा घटस्फोट झाला अशी चर्चाही सुरु झाली होती. आमीर खानचं दुसरं लग्नही मोडल्याने आता तिसऱ्या लग्नाची तयारी का असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला डिवचलं आहे. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आमीर आणि फातिमा पिकलबॉल खेळताना दिसत आहेत. यावरुन पुन्हा चर्चेला उधाण आलंय. योगेश शाह या इन्स्टाग्राम युझरने त्याच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत आहेत. 'मम्मी नंबर ३ येणार आहे','यापेक्षा चांगलं स्वत:च्याच मुलीशी लग्न केलं असतं,'आमिर अरे तुझ्या मुलीच्या वयाची आहे सोड तिला','लव्हबर्ड्स' अशा कमेंट्स व्हिडिओवर येत आहेत. सध्या आमीर खानने चित्रपटातून ब्रेक घेतला आहे.