विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 13:00 IST2022-03-09T13:00:00+5:302022-03-09T13:00:00+5:30
Vicky kaushal mother: अलिकडेच विकीने कतरिना आणि त्याच्या आईचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सासू-सुनांमधील प्रेम दिसून येत आहे.

विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई
'मसान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल (Vicky Kaushal). 'राझी', 'संजू', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'भूत', 'सरदार उधम' या चित्रपटातून त्याने त्याचं अभिनयकौशल्य दाखवलं. त्यामुळे आजा विकी लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. अलिकडेच विकीने अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न केलं. लग्नानंतर विकीने कतरिनासोबतचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आईचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेता विकी कौशलच्या कुटुंबातील त्याचे वडील, भाऊ आणि पत्नी कतरिना यांच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या आईविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. त्याचे वडील तरी प्रसारमाध्यमांसमोर येतात. परंतु, त्याची आई फार क्वचित वेळा प्रकाशझोतात येते. त्यामुळेच त्याच्या आईविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते.
अलिकडेच विकीने कतरिना आणि त्याच्या आईचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सासू-सुनांमधील प्रेम दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत विकीने , 'My Strength, My World' म्हणजेच 'माझी ताकद, माझं जग', असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ही खूप गोड फॅमिली आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. तर, काही जणांना सासू-सुनेमधील प्रेम विशेष आवडलं आहे.