Video: विकी कौशल चक्क चिमुरडीसमोर नतमस्तक झाला; स्टेजवरील भावुक क्षण, तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:21 IST2026-03-03T11:20:16+5:302026-03-03T11:21:57+5:30

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. २०२५ ला विकीने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.

Vicky Kaushal bows down in front of a little girl Emotional moment on stage video viral | Video: विकी कौशल चक्क चिमुरडीसमोर नतमस्तक झाला; स्टेजवरील भावुक क्षण, तुमचेही डोळे पाणावतील

Video: विकी कौशल चक्क चिमुरडीसमोर नतमस्तक झाला; स्टेजवरील भावुक क्षण, तुमचेही डोळे पाणावतील

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. २०२५ ला विकीने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. सिनेमातील विकीने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. नुकताच एक पुरस्कार सोहळा पार पडला. यात विकीसमोर एका चिमुकलीने  'छावा' सिनेमातील संवाद म्हटले. ते ऐकताच विकी भारावून गेला आणि चिमुकलीसमोर नतमस्तक झाला.

विकी कौशल चिमुकलीसमोर झाला नतमस्तक

विकी कौशल एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यावेळी एक चिमुकली मुलगी साडी नेसून मंचावर आली होती. त्या चिमुरडीने विकीच्या 'छावा' सिनेमातले संवाद तिच्या निरागस अंदाजात म्हटले. 'हम शोर नही करते, सिधा शिकार करते है', 'जय भवानी' हे खास संवाद त्या चिमुकलीने तिच्या खास अंदाजात म्हटले. विकीने सुद्धा त्या चिमुकलीला प्रोत्साहन देऊन तिला दाद दिली. चिमुकलीचा परफॉर्मन्स झाल्यावर विकी तिच्यासमोर नतमस्तक झाला आणि तिच्या पाया पडला.





विकीच्या या कृतीने सर्वजण थक्क झाले. ''एक ही तो दिल है विकी, कितनी बार जितोगे'', अशा कमेंट करत विकीचं अनेकांनी कौतुक केलं. मोठ्या कलाकारांसमोर परफॉर्म करण्यात अनेकांना दडपण येतं. त्या चिमुकलीला दडपण येणं साहजिक आहे. पण विकीने तिला दाद देऊन चिमुकलीचं मनोबल वाढवलं. विकीने याच पुरस्कार सोहळ्यात  'छावा' सिनेमातील गाण्यावर खास सादरीकरण केलं. विकीला 'छावा' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.

Web Title: Vicky Kaushal bows down in front of a little girl Emotional moment on stage video viral