कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:33 IST2025-09-15T15:33:09+5:302025-09-15T15:33:57+5:30

Katrina Kaif Pregnancy: विकी-कतरिनाच्या घरी पाळणा हलणार, प्रेग्नंसीच्या चर्चा ठरल्या खऱ्या

vicky kaushal and katrina kaif become parents soon actress may give birth in october or november | कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा

कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा

Katrina Kaif Pregnancy: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) आई बाबा होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कतरिना कैफ सोशल मीडियावरुन गायब आहे. तसंच ती इव्हेंट्स किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणीही दिसली नाही. काही दिवसांपूर्वी ती विकीसोबत जेट्टीवर दिसली होती. तेव्हा तिने ओव्हरसाईज पांढरा शर्ट घातला होता. तेव्हापासूनच कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. तर आता कतरिना प्रेग्नंट असल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

'एनडीटीव्ही'च्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ गरोदर असून याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती लाईमलाईटपासून दूर आहे. आता पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही ती मोठा ब्रेक घेणार आहे. तिला संपूर्ण वेळ बाळाच्या संगोपनासाठी द्यायचा आहे. अद्याप यावर विकी आणि कतरिनाकडून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या बातमीमुळे दोघांचे चाहते खूप खूश झाले आहेत. 

गेल्यावर्षी विकीला 'बॅड न्यूज'च्या ट्रेलर लाँचवेळी कतरिनाच्या प्रेग्नंसीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणालेला, 'गुडन्यूजबाबतीत सांगायचं तर जेव्हा तसं असेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करु. पण सध्या यात तथ्य नाही. आता तुम्ही बॅड न्यूज एन्जॉय करा.' त्यामुळे आता विकी ही गुडन्यूज चाहत्यांना कधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी २०२१ मध्ये राजस्थान येथे लग्नगाठ बांधली. यानंतर आता ४ वर्षांनी ही जोडी आयुष्यातील नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. प्रोफेशनल आयुष्यातही विकी कौशल बॉलिवूडमध्ये आघाडीवर आहे. 'छावा'च्या तुफान यशानंतर तो आता 'लव्ह अँड वॉर'सिनेमात दिसणार आहे. तर कतरिना शेवटची गेल्या वर्षी आलेल्या 'मेरी ख्रिसमस'सिनेमात दिसली होती. यानंतर तिने कोणत्याही सिनेमा काम केलं नाही. आता ती मातृत्वाचा अनुभव घेणार आहे.

Web Title: vicky kaushal and katrina kaif become parents soon actress may give birth in october or november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.