Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : लग्नाचं स्पेशल फुटेज द्या, 100 कोटी घ्या...! विकी-कतरिनाला ओटीटीची तगडी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:19 IST2021-12-07T11:47:34+5:302021-12-07T12:19:49+5:30
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : लग्नातून 100 कोटींची कमाई? विकी-कतरिना स्वीकारणार का डील?

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : लग्नाचं स्पेशल फुटेज द्या, 100 कोटी घ्या...! विकी-कतरिनाला ओटीटीची तगडी ऑफर
कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal) येत्या 9 डिसेंबरला लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. लग्नाची जय्यत तयारी झालीय, विकी व कतरिना राजस्थानात पोहोचलेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा या ठिकाणी हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नसोहळा अतिशय खासगी आहे पण लग्नाची चर्चा जोरात आहे. आज रात्री संगीत सेरेमनी, उद्या हळद आणि परवा लग्न, असा सगळा प्लान आहे. चाहते लग्नाचे फोटो पाहायला उत्सुक आहेत. पण कतरिना व विकीने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त केलाये. अशात एक ताजी बातमी कानावर येतेय. होय, एका ओटीटी प्लॅटफॉर्मने म्हणे, कतरिना व विकीला लग्नाच्या स्पेशल फुटेजच्या बदल्यात मोठी ऑफर दिली आहे. होय, साधीसुधी ऑफर नाही तर तब्बल 100 कोटींची ऑफर.
‘पिंकव्हिला’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. विकी व कतरिनाच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. साहजिकच हा सोहळा ‘कॅश’ करण्याचा संबंधित ओटीटी कंपनीचा विचार आहे. या बदल्यात विकी व कतरिनाला 100 कोटींची ऑफरर कंपनीने दिली आहे. विकी व कतरिनाने ही डील स्वीकारलीच तर ही एक मोठी डील असेल. पाश्चात्य देशांमध्ये तसाही हा ट्रेंड आहे. आता हा ट्रेंड विकी व कतरिना फॉलो करतात का? हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
विकी व कतरिनाने ही ऑफरस्वीकारल्यास ओटीटी कंपनी त्यांच्या लग्नातील सर्व फंक्शन कव्हर करेल आणि नंतर ते ‘फीचर’ म्हणून प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करेल, असं कळतंय.
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील विधींना आजपासून सुरुवात होत आहे. काल रात्री दोघेही पोलिसांच्या कडक बंदोबस्तात लग्नस्थळी पोहोचलेत. त्याठिकाणी त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं.