"वेळ चांगली असो किंवा वाईट...", तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान वीर पहाडियाची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:31 IST2026-01-15T11:28:46+5:302026-01-15T11:31:12+5:30
वर्षभराचं नातं संपलं? तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान वीरची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाला...

"वेळ चांगली असो किंवा वाईट...", तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान वीर पहाडियाची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
Veer Pahariya Post: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पहारिया आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अगदीच काही दिवसांपूर्वी एपी ढिल्लोंच्या एका कॉन्सर्टला तारा आणि वीर दोघेही गेले होते. त्यादरम्यानचा, एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यानंतर आता वीर-तारा वेगळे झाल्याचं म्हटलं जात आहे. आता एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा होत असताना वीर पहारियाने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, ब्रेकअपच्या चर्चांवर वीर आणि ताराने अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र, त्यांचं एकत्र नं दिसणं शिवाय नुपूर सनॉन आणि स्टेबिन बेन यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये वीर पहाडियाने एकट्याने हजेरी लावणं यावरून त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान, वीर पहाडियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. या पोस्टला कॅप्शन देत वीरने लिहिलंय, वेळ चांगली असो किंवा वाईट, एक ना एक दिवस नक्कीच बदलते...", अशा आशयाची पोस्ट लिहून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वीरची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पोस्टवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, "आम्हाला तुम्हाला तारासोबत पाहायचे आहे.कृपया,तुम्ही एकत्र या...", तर आणखी एका यूजरने म्हटलंय," वीर आणि तारा एकत्र खूप छान दिसत होते."
काय घडलेलं त्या दिवशी?
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये तारा आणि वीर उपस्थित होते. त्यावेळी ताराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.यामध्ये ती गायकासोबत स्टेजवर होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल झाला की, गायक अभिनेत्रीला स्टेजवरच किस करतोय आणि त्यावेळी गर्दीमध्ये उभा असलेल्या वीर खूपच अस्वस्थ झाला आहे. असं काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी ताराला 'गोल्ड डिगर'ही म्हटलं होतं. या प्रकरणी प्रतिक्रिया देत तारा चांगलीच संतापली होते. तारा तिच्या इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देत हे सगळं खोटं असून आणखी रंगवून सांगितलं जातंय आणि 'Paid PR' म्हणत टीका केली होती.