उर्वशीचा बाथरुम व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर खळबळ; नेटकरी म्हणाले, 'गळ्यात मंगळसूत्र...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:29 IST2024-07-17T16:28:31+5:302024-07-17T16:29:18+5:30
सोशल मीडियावरील प्रत्येक एंटरटेन्मेंट पेजवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उर्वशीचा बाथरुम व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर खळबळ; नेटकरी म्हणाले, 'गळ्यात मंगळसूत्र...'
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आज सोशल मीडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बाथरुममधला हा व्हिडिओ असून ती चक्क कपडे काढताना दिसतीये. तिच्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. हा एमएमएस आहे की कोणता पब्लिसिटी स्टंट असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोशल मीडियावरील प्रत्येक एंटरटेन्मेंट पेजवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका सामान्य बाथरुममध्ये उर्वशी येते. तिचा टॉवेल अडकवते आणि तिचे केस नीट करते. नंतर अंघोळीसाठी ती टॉप काढायला सुरुवात करते. नंतर इथेच व्हिडिओ थांबतो. सर्वांनीच कॅप्शन देत लिहिले, 'उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडिओ लीक ज्याची सध्या चर्चा आहे.'
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत 'चीप स्टंट' म्हटले आहे. तसंच अनेकांनी उर्वशीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून हा सिनेमातला सीन असल्याचा अंदाज लावला आहे. तसंच उर्वशी इतक्या साध्या बाथरुममध्ये का जाईल अशीही कमेंट केली आहे. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंच अनेकांचं म्हणणं आहे. या प्रकारावर अद्याप उर्वशीच्या टीमकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेले नाही.
उर्वशीचा नुकताच 'जेएनयू' सिनेमा रिलीज झाला. आता ती आगामी 'ब्लॅक रोज' या तेलुगु आणि 'दिल है ग्रे' या हिंदी सिनेमात दिसणार आहे.