म्हणे, मला पर्वा नाही...; अवनीत कौर करणार 27 वर्षांनी मोठ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 13:51 IST2022-02-27T13:49:28+5:302022-02-27T13:51:01+5:30
Tiku Weds Sheru : अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. साहजिकच, स्वत:पेक्षा 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत नवाज रोमान्स करताना दिसणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण...

म्हणे, मला पर्वा नाही...; अवनीत कौर करणार 27 वर्षांनी मोठ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ ( Tiku Weds Sheru) या सिनेमात झळकणार आहे. अभिनेत्री कंगना राणौत हिचाही या सिनेमाशी संबंध आहे. कंगना या चित्रपटाची प्रोड्यूसर आहे. अर्थात खरी बातमी पुढे आहे. होय, नवाजुद्दीन या सिनेमात त्याच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ती अभिनेत्री कोण तर अवनीत कौर ( Avneet Kaur).
‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेत आणि शेकडो जाहिरातींमध्ये अवनीतला तुम्ही पाहिलं असेलच. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केलं आहे. हीच अवनीत आता ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. अवनीत व नवाज यांच्यात 27 वर्षांचं अंतर आहे. अवनीत नवाजपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. साहजिकच, स्वत:पेक्षा 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत नवाज रोमान्स करताना दिसणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण नवाज व अवनीत यांना काहीही फरक पडत नाही.
अवनीत म्हणाली, मला पर्वा नाही...
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अवनीत यावर बोलली. मेल व फिमेल स्टारच्या वयातील फरकामुळे मला काहीही फरक पडत नाही. माझ्यामते, यात काहीही अडचण नाही. यापूर्वी अनेक चित्रपटात अनेक हिरो त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसले आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. कंगना मॅमने आधीच मला सांगितलं होतं, ही कथेची गरज आहे आणि मलाही तेच वाटतं. मी दीर्घकाळ स्ट्रगल केला आहे आणि मला संधी हवी होती. माझ्यात प्रतिभा आहे, हे मला दाखवायचं आहे आणि मी फक्त तेच करणार, असं अवनीत म्हणाली.
अवनीतने वयाच्या 8 व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकांत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्