थरारक कथा अन् अंगावर काटा आणणारे सीन्स; १ तास ५० मिनिटांचा 'हा' हॉरर सिनेमा पाहून फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:46 IST2025-09-01T12:39:41+5:302025-09-01T12:46:58+5:30

प्रत्येक सीनमध्ये ट्विस्ट अन्...; 'हा' हॉरर सिनेमा उडवेल तुमची झोप

thrilling story and spine tingling scenes ram gopal varma directed phoonk horror movie based on black magic must watch | थरारक कथा अन् अंगावर काटा आणणारे सीन्स; १ तास ५० मिनिटांचा 'हा' हॉरर सिनेमा पाहून फुटेल घाम

थरारक कथा अन् अंगावर काटा आणणारे सीन्स; १ तास ५० मिनिटांचा 'हा' हॉरर सिनेमा पाहून फुटेल घाम

Phoonk Movie: जगभरात हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांची काही कमी नाही. हा असा जॉनर आहे की या जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यास खूप आवडतात.सध्या या चित्रपटांचा ट्रेंड सुरु आहे.शिवाय अनक निर्मातेही या शैलीचे चित्रपट बनवताना दिसत आहेत.२००८ साली प्रदर्शित झालेला असाच एक चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचं नाव म्हणजे फूंक आहे. या हॉरर चित्रपटात अहसास चन्नाने केलेल्या कॉमची सर्वांनीच स्तुती केली होती.

जेव्हा हॉरर थ्रिलर चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा हॉलिवूड सिनेमांबद्दल चर्चा होते.पण, भारतीय चित्रपटसृष्टीतही अशी अनेक उत्कृष्ट हॉरर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. फूंक चित्रपट त्यांपैकी एक आहे. २२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'फूंक' चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं.

 या चित्रपटाची कथा एका कुटुंबात घडणाऱ्या रहस्यमय घटनांभोवती फिरते. चित्रपटातील काही सीन्स पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. ते सीन्स म्ही तो एकट्याने पाहण्याची हिंमत करणार नाही. तसंच या चित्रपटाची निर्मिती प्रवीण निश्चल आणि परवेझ दमानिया यांनी केली होती. त्याचबरोबर २०१० मध्ये या चित्रपटाती सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला विशेष म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला होता.

'फूंक' हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता.या चित्रपटात अहसास चन्ना, गणेश यादव, अमृता खानविकर, लिलित दुबे आणि अश्विनी केळकर असे कलाकार होते. हा चित्रपट YouTube वर विनामूल्य पाहता येईल.

Web Title: thrilling story and spine tingling scenes ram gopal varma directed phoonk horror movie based on black magic must watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.