ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:54 IST2024-07-04T13:52:09+5:302024-07-04T13:54:05+5:30

Raveena Tandon : रवीना टंडन या चित्रपटामुळे सुपरस्टार बनली. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि रवीना टंडनची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली.

The Aishwarya Rai-Sridevi rejected film made Raveena Tandon a star and starred Akshay Kumar. | ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत

ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत

१९९४ साली रिलीज झालेला मोहरा (Mohara Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटाच्या यशाने रवीना टंडन(Raveena Tandon)ला सुपरस्टार बनविले होते.  या चित्रपटातील अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रवीना टंडन(Raveena Tandon)ची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. यातील टिप टिप बरसा पानी आणि तू चीज बड़ी है मस्त मस्त ही गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. मात्र या चित्रपटाला होकार देताना रवीना संकोच करत होती. इंटरेस्टिंग बाब ही आहे की, रवीनाच्या आधी या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि श्रीदेवीला विचारण्यात आले होते. मात्र त्या दोघींनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. 

मोहरा चित्रपटाचे सह पटकथा लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, रवीना टंडनला हा सिनेमा कसा मिळाला होता. फार कमी लोकांना माहित असेल की, मोहरासाठी पहिली अभिनेत्री दिव्या भारती होती. तिने अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत काही दिवसांपर्यंत शूटिंग केले होते. मात्र नंतर अचानक तिचं निधन झालं आणि शूटिंग थांबलं होतं. त्यानंतर निर्माते नवीन नायिकेचा शोध घ्यायला सुरूवात केली. 

ऐश्वर्या-श्रीदेवीला सिनेमाची दिली होती ऑफर
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शब्बीर बॉक्सवालाने सांगितले की, मी ऐश्वर्या रायचा फोटो पाहिला, जो मला आवडला. राजीव (मोहराचे दिग्दर्शक ) यांनी मला तिच्याशी बोलायला सांगितले. मात्र ऐश्वर्याने नकार दिला कारण त्यावेळी ती मिस वर्ल़्डची तयारी करत होती. ते पुढे म्हणाले की, त्यांनी मोहरासाठी श्रीदेवीला विचारले होते मात्र त्यावेळी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी प्रसिद्ध नव्हते. तिला नवोदित अभिनेत्यांसोबत काम करायचे नव्हते. त्यामुळे तिने चित्रपट नाकारला.

रवीना टंडनही सिनेमात करण्यासाठी नव्हती तयार, पण...
अखेर मोहरा चित्रपटासाठी रवीना टंडनला विचारण्यात आले. मात्र तीदेखील सिनेमात काम करण्यासाठी संकोच करत होती. कारण टिप टिप बरसा पानी या गाण्यात अक्षय कुमारसोबत एक किसिंग सीन होता. शब्बीर म्हणाले की, राजीव यांच्यासोबत रवीनाची भेट झाली आणि तिला माहित होते की हा चांगला प्रोजेक्ट आहे. टिप टिप बरसा पानी या गाण्यात एक किसिंग सीन होता, ज्यामुळे रवीना गोंधळली होती. रवीनाने वडिलांना हे आवडणार नाही, असे सांगताच राजीवने गमतीने हा चित्रपट वडिलांना दाखवू नये, असे सांगितले. यानंतर रवीना टंडनने 'मोहरा'मध्ये काम करण्यास होकार दिला.

Web Title: The Aishwarya Rai-Sridevi rejected film made Raveena Tandon a star and starred Akshay Kumar.