लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:47 IST2024-03-26T12:40:06+5:302024-03-26T12:47:34+5:30

एकीकडे संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

Taapsee Pannu Celebrates Holi With Mathias Boe Amid Reports Of Wedding - See Pics | लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूचे होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. यातच तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तापसी ही विवाहबंधनात अडकली असल्याचे वृत्त आहे. एकीकडे संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. यातच आता तापसीच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.

लग्नाची बातमी खरी असेल तर अभिनेत्रीची ही लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. तापसीचा मित्र अभिलाष थापलियालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळीच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबत तापसीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आमची होळी'. या फोटोंमध्ये तापसीच्या भांगेत रंग हा सिंदूर सारखा भरलेला दिसून येत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.  

न्यूज18 च्या बातमीनुसार, तापसी पन्नूने 20 मार्च 2024 रोजी मॅथियास बोयेसोबत गुपचूप लग्न केलं आहे. अभिनेत्रीला तिच्या लग्नात कोणताही गदारोळ नको होता, म्हणून तिने अत्यंत गुप्त पद्धतीने लग्न उरकलं. या लग्नाला बॉलिवूडमधील फक्त अनुराग कश्यप आणि थप्पड को-स्टार पावेल गुलाटी यांनी हजेरी लावली होती. अद्याप तापसीनं लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

पण तुम्हाला माहित आहे का मॅथियास काय करतो आणि तो कोण आहे. तर मॅथियास बोये हा एक बॅडमिंटनपटू आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. एका मॅचदरम्यान दोघांची भेट झाली होती. गेल्या काही वर्षांपासून मॅथियाससोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही अनेकदा एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
 

Web Title: Taapsee Pannu Celebrates Holi With Mathias Boe Amid Reports Of Wedding - See Pics