'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:18 IST2025-03-18T16:16:48+5:302025-03-18T16:18:10+5:30
पिंक मध्ये तापसी आणि किर्ती एकत्र दिसल्या होत्या. तेव्हा तापसी आधीच लोकप्रिय होती.

'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत
अभिनेत्री किर्ती कुल्हारीचं (Kirti Kulhari) विधान काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'पिंक' या गाजलेल्या सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा तिने नुकताच केला. 'पिंक' सिनेमा अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका होती. किर्तीचीही यामध्ये मुख्य भूमिका होती मात्र तरी प्रमोशनवेळी तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही अशी तक्रार तिने एका मुलाखतीत केली. आता यावर तापसीची (Taapasee Pannu) प्रतिक्रिया आली आहे.
ईटाइम्सशी बोलताना तापसी म्हणाली, "मला कसं माहित असेल की तिला काय वाटतंय. तिला आपल्या भावना मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर कोणाला असं काही वाटत असेल तर नक्कीच त्यामागे काही कारण असणार. तिची मर्जी तिने आवाज उठवला. जर मला तेव्हाच समजलं असतं की किर्तीला असं काही वाटत आहे तर मी तेव्हाच तिच्याशी नीट बोलले असते. तिला चांगलं वाटेल असं काही केलं असतं. मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती. पण म्हणून मी तिच्या भावनांचा अनादर करणार नाही."
ती पुढे म्हणाली, "मी खूप प्रोफेशनल वागते. किर्ती आणि मी मैत्रिणी नाही पण प्रोफेशनल लेव्हलवर आमचे चांगले संबंध आहेत. मिशन मंगलमध्येही मी काम केलं आहे. मला नाही वाटत प्रोफेशनल लेव्हलवर मला काही वेगळं वाटलं. मला कोणतीच असमानता दिसली नाही. त्यामुळे माझ्यासाठी किर्ती तीच होती जिने पिंकमध्ये काम केलं होतं."