सुशांत सिंग राजपूतची दुबईत ‘जबरा फॅन मोमेंट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 15:46 IST2017-01-05T15:46:20+5:302017-01-05T15:46:20+5:30

‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खान याची फॅन फॉलोर्इंग काय कमी आहे का? आता त्यात आणखी एका फॅनची भर पडलीय. होय, ...

Sushant Singh Rajput's 'Jabra Fun Moment' in Dubai! | सुशांत सिंग राजपूतची दुबईत ‘जबरा फॅन मोमेंट’!

सुशांत सिंग राजपूतची दुबईत ‘जबरा फॅन मोमेंट’!

ॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खान याची फॅन फॉलोर्इंग काय कमी आहे का? आता त्यात आणखी एका फॅनची भर पडलीय. होय, अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नाव आता शाहरूख खानच्या ‘फॅनडम’ मध्ये समाविष्ट झाले आहे. त्यामुळे तो त्याला जशी संधी मिळेल तशी शाहरूखची नक्कल करून पाहत असतो. आता हेच पाहा ना, दुबईत त्याने शाहरूखची सिग्नेचर पोझ चालत्या ओपन कारमध्ये करून पाहिली. त्याने त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलाय.  

                               

सुशांतसिंग राजपूत अलीकडेच लंडनमध्ये व्हॅकेशन्ससाठी गेला होता. त्यानंतर तो दुबईत पोहोचला. तिथे आऊटिंगला गेला असताना त्याच्या ओपन कारमध्ये तो उभा राहिला. पाहता पाहता त्याने त्याचे दोन्ही हात बाजूला सारून शाहरूख खानची सिग्नेचर पोझ केली. शाहरूखचा ‘जबरा फॅन’ असल्याचे त्याने सोशल मीडियावर कबूल केले. त्याने एक छोटासा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘शाहरूख तुमच्याएवढं रोमँटिक कोणी असू शकतं का? पण, दुबईत तरी मी ही सिग्नेचर पोझ नक्कीच करून पाहिली.’ 

                                                       

‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक आहे. या बायोपिक मध्ये त्याने साकारलेल्या अभिनयाचे ‘बी टाऊन’च्या कलाकारांनीही कौतुक केले. अलीकडेच मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. क्रिती सॅनन हिच्यासोबत साकारलेला ‘राब्ता’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पाहुयात, सुशांत आणि क्रिती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कशी वाटतेय ते..!
 

Web Title: Sushant Singh Rajput's 'Jabra Fun Moment' in Dubai!