"बॉलिवूडकडून शिकले अन् आता आपल्यावरच भारी पडत आहेत", साउथ इंडस्ट्रीबद्दल सनी देओलचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:31 IST2025-04-02T18:30:48+5:302025-04-02T18:31:29+5:30

हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं नक्की कुठे चुकतंय? सनी देओल म्हणाला...

sunny deol talks straight about hindi film industry loosing passion to make cienma south industry learnt from us now they are over us | "बॉलिवूडकडून शिकले अन् आता आपल्यावरच भारी पडत आहेत", साउथ इंडस्ट्रीबद्दल सनी देओलचं वक्तव्य

"बॉलिवूडकडून शिकले अन् आता आपल्यावरच भारी पडत आहेत", साउथ इंडस्ट्रीबद्दल सनी देओलचं वक्तव्य

'गदर २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करणारा अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या चर्चेत आहे. सनी देओलवर साउथ इंडस्ट्रीने प्रभाव पाडला आहे. बॉलिवूडने साउथकडून शिकलं पाहिजे असं वक्तव्य त्याने काही दिवसांपूर्वीच केलं. आता पुन्हा त्याने साउथचं कौतुक केलं आहे. ते आपल्याकडूनच शिकले आणि आता आपल्यावरच भारी पडत आहेत असं तो म्हणाला आहे. नक्की काय म्हणाला सनी देओल वाचा.

'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सनी देओल म्हणाला, "आपल्या इंडस्ट्रीत सिनेमासाठी जे पॅशन होतं ते कुठे का कुठे गायब झालं आहे. साउथ इंडस्ट्रीने आपल्याकडूनच शिक्षण घेतलं आणि आता तेच आपल्यावर भारी पडत आहेत. म्हणूनच आज आपण साउथ सिनेमांचे रिमेक बनवायला लागलो आहे."

तो पुढे म्हणाला, "स्टोरी कलाकाराची असते आणि दिग्दर्शक बॉस असतो. दोघांनी सोबत येऊन काम करायला हवं. पण आजकाल प्रत्येकाला वाटतं की मलाच सगळं समजतं. जो मॉनिटरसमोर बसला आहे तो फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतो. इथेच चुका व्हायला सुरुवात होते."
'गदर २'च्या यशावर सनी देओल म्हणाला, "गदर २ ची खासियस ही होती की आम्ही त्याच भूमिका, तोच काळ, अगदी तशाच प्रकारे पूर्ण आत्मविश्वासाने दाखवला. त्यात मी आजच्या काळातला मॉडर्नपणा आणला नाही."

सनी देओल आगामी 'जाट' सिनेमात दिसणार आहे. साउथ दिग्दर्शक गोपीचंद यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये  सनीसोबत रणदीप हुड्डाही आहे. सिनेमाचा ट्रेलर आला असून यामध्ये फुलऑन अॅक्शन पाहायला मिळणार आहे. १० एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होत आहे.

Web Title: sunny deol talks straight about hindi film industry loosing passion to make cienma south industry learnt from us now they are over us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.