बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:15 IST2026-01-29T10:12:22+5:302026-01-29T10:15:22+5:30
सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने मोठा टप्पा गाठला आहे

बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २८ वर्षांनंतर आलेल्या या सीक्वलने प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली आहे.
'बॉर्डर २' ने सहाव्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर साधारण १३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जरी कमाईत थोडी घट झाली असली, तरी चित्रपटाचे एकूण भारतीय कलेक्शन आता २१३ कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सहा दिवसांच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने आमिर खानचा 'दंगल', प्रभासचा 'कल्कि २८९८ एडी', राम चरणचा 'RRR' आणि रणवीर सिंगचा 'धुरंधर' यांसारख्या १००० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.
केवळ भारतातच नाही, तर जगभरातही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ५ दिवसांतच या चित्रपटाने जगभरातून २७७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता सहाव्या दिवसाच्या आकडेवारीसह हा चित्रपट लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशभक्ती आणि युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाने हे सिद्ध केले आहे की, प्रेक्षक आजही इंडियान आर्मीची शौर्यगाथा पाहण्यास आणि भावुक कथा अनुभवण्यास पुढे येतात.