SRK Birthday: सध्या जगातील श्रीमंत अभिनेता असलेल्या शाहरुख खानची पहिली कमाई होती फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:36 IST2025-11-02T12:34:52+5:302025-11-02T12:36:41+5:30
आज शाहरुखचा वाढदिवस. शाहरुख खानची पहिली कमाई वाचून थक्कच व्हाल

SRK Birthday: सध्या जगातील श्रीमंत अभिनेता असलेल्या शाहरुख खानची पहिली कमाई होती फक्त...
'किंग खान' (King Khan) म्हणून जगभरात ओळखला जाणारा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज २ नोव्हेंबर रोजी ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. ३३ वर्षांपूर्वी आपल्या करिअरची सुरुवात करणारा शाहरुख खान हा आज केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. अब्जावधीची संपत्ती असलेल्या शाहरुखची पहिली कमाई वाचून थक्क व्हाल आणि तुम्हालाही प्रेरणा मिळेल.
शाहरुखची पहिली कमाई फक्त...
आज अब्जावधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या शाहरुख खानची पहिली कमाई फक्त ५० रुपये होती, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका मुलाखतीत त्याने स्वतः याबद्दल खुलासा केला होता. ही ५० रुपयांची कमाई त्याने दिवंगत गायक पंकज उधास यांच्या एका शोमध्ये काम करून मिळवली होती. या शोमध्ये लोकांच्या तिकिटांची तपासणी करून त्यांना आत प्रवेश देण्याचे काम शाहरुखने केले होते. विशेष म्हणजे, त्याने या पहिल्या कमाईचा वापर आग्रा येथील ताजमहाल पाहण्यासाठी केला होता, असं त्याने सांगितलं.
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता
फक्त ५० रुपयांची पहिली कमाई असलेला शाहरुख आज चित्रपट जगतातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या हुरुन रिच लिस्ट २०२५ नुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती १२,४९० कोटी रुपये (सुमारे $1.5 बिलियन) असल्याचं सांगण्यात आले आहे. जगातील इतर कोणत्याही कलाकाराकडे इतकी संपत्ती नाही. शाहरुखने १९९२ मध्ये 'दीवाना' (Deewana) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अलीकडेच 'पठाण', 'जवान', 'डंकी'सह अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. शाहरुखचा आगामी चित्रपट 'किंग'चा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.