सोनू सूदच्या 'त्या' वक्तव्यावर आगपाखड केल्यानंतर अभिनेत्याने दिलं राजपाल यादवला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:19 IST2026-03-04T10:18:35+5:302026-03-04T10:19:06+5:30
Sonu sood: सोनू सूदने दिलेल्या सिनेमाच्या ऑफरवर राजपालने त्याचं मत मांडलं. परंतु, त्याने ज्या पद्धतीने मत मांडलं ते प्रेक्षकांना फारसं रुचलं नाही. यामध्येच आता सोनू सूदने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनू सूदच्या 'त्या' वक्तव्यावर आगपाखड केल्यानंतर अभिनेत्याने दिलं राजपाल यादवला उत्तर
फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल ती म्हणजे अभिनेता राजपाल यादवची. चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादव नुकताच तिहार तुरुंगात बाहेर आला आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्याला मदतीचा हात पुढे केला. अभिनेता सोनू सूद यानेही त्याला सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र, याचा राग राजपालला आला आणि त्याने सोनूला खोचक शब्दांत सुनावलं. यावर आता सोनू सूदने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच राजपालने एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने चेक बाऊन्स प्रकरणी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच सोनू सूदने दिलेल्या सिनेमाच्या ऑफरवरही त्याचं मत मांडलं. परंतु, त्याने ज्या पद्धतीने त्याच मत मांडलं ते प्रेक्षकांना फारसं रुचलं नाही. यामध्येच आता सोनू सूदने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सोनू सूद?
अलिकडेच सोनू सूदने HT City ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने राजपालने केलेल्या वक्तव्यावर त्याचं मत मांडलं. मी त्याच्यासाठी आनंदी आहे. त्याला काम हवंय असं मी कधीच म्हटलं नव्हतं. मी फक्त इतकंच म्हटलं होतं की त्याला सिनेमात घ्या आणि जमलं तर त्याला अॅडव्हान्स पेमेंट द्या. कारण, तो त्याचा हक्क आहे, असं सोनू सूदने प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाला होता राजपाल?
''मला काम मागावं लागतंय, या गैरसमजातून कृपा करुन बाहेर या. आणि, काम मागण्यासाठी लाज वाटावी असंही काही नाहीये. मी माझ्या कामातूनच माझा उदनिर्वाह करतोय. सिनेमा माझं ध्येय आणि मी अशा पद्धतीने काम करतो की ज्यामुळे मला चार काम जास्तीचीच मिळतात'', असं राजपाल यादव म्हणाला होता. दरम्यान,राजपाल लवकरच भूत बंगला या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. त्याचसोबत तो मल्टीस्टारर वेलकम टू द जंगल या सिनेमातही दिसणार आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे दोन वेबसीरिज आणि २ सिनेमादेखील आहेत.