ड्रामा क्वीन, ओव्हर अॅक्टिंगची दुकान... सोनम कपूर ट्रोल, रॅम्प वॉक करताना ढसढसा का रडली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:18 IST2025-02-02T14:18:39+5:302025-02-02T14:18:52+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ड्रामा क्वीन, ओव्हर अॅक्टिंगची दुकान... सोनम कपूर ट्रोल, रॅम्प वॉक करताना ढसढसा का रडली?
Sonam Kapoor Get Troll: सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर (Sonam Kapoor Desi Look) फॅशनिस्ट म्हणून ओळखली जाते. विविध फॅशन शोमध्ये ती सहभागी होत असते. सध्या सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप होत आहे. ज्यामध्ये सोनम अचानक रॅम्प वॉक करताना ढसाढसा रडताना दिसून येत आहे. पण, यावरुन तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
सोनम कपूरने नुकतंच गुरुग्राम येथे आयोजित केलेल्या "ब्लेंडर्स प्राइड एक्स एफडीसीआय फॅशन टूर २०२५' मध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी सोनमनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर तिने केसात बरेच गुलाब माळले. तिचा लूक आकर्षक होता. पण, यावेळी रॅम्प वॉक करताना सोनम रडायला लागली. दिवंगत प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलच्या आठवणीत ती भावूक झाली. पण, युजर्सनी "ड्रामा क्वीन', 'ओव्हर अॅक्टिंगची दुकान', 'खरोखर रडली असती तर ते अधिक सुंदर वाटले असते', अशा कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी रोहित बल यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी हृदयरोगामुळे निधन झालं. सोनमनं पोस्ट शेअर करत रोहित बल यांना श्रद्धांजली वाहिली. "दिग्गज रोहित बल यांना श्रद्धांजली वाहण्याचा सन्मान मिळाला. भारतीय फॅशनला त्यांची कलात्मकता, दूरदृष्टी आणि वारसा लाभला. ज्यामुळं भारतीय फॅशनला एक अतुलनीय आकार मिळाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रॅम्पवर चालणं हे भावनिक आणि प्रेरणादायी होतं", असं सोनमने कॅप्शनमध्ये लिहिलं.