सोनाक्षी सिन्हानं शेअर केले पती झहीर इक्बालबरोबरचे व्हॉट्सअॅप चॅट्स, प्रेग्नेंसीबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:38 IST2025-07-04T15:37:34+5:302025-07-04T15:38:32+5:30
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

सोनाक्षी सिन्हानं शेअर केले पती झहीर इक्बालबरोबरचे व्हॉट्सअॅप चॅट्स, प्रेग्नेंसीबद्दल म्हणाली...
Sonakshi Sinha on Pregnancy Rumour : शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. आता अशी चर्चा रंगली आहे की, सोनाक्षी आणि झहीर यांच्याकडे गुडन्यूज आहे. सोनाक्षी प्रेग्नंट आहे आणि लवकरच ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील, अशा चर्चा रंगल्यात. मात्र, यावर सोनाक्षीनं अतिशय स्मार्ट आणि विनोदी अंदाजात उत्तर दिलंय.
.
सोनाक्षीनं इंस्टाग्रामवर तिच्या स्टोरीमध्ये झहीरसोबतच्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉट ( Sonakshi Sinha Shares Whatsapp Chats With Husband Zaheer Iqbal) शेअर केलाय. त्या चॅटमध्ये दिसतंय की झहीर तिला विचारतो, "भूक लागलीये का?" त्यावर सोनाक्षी उत्तर देते, "भूक नाही आहे. जबरदस्तीने खाऊ घालणं बंद कर". पुढे झहीर म्हणतो, "मला वाटलं सुट्ट्या सुरू झाल्या आहेत".त्यावर सोनाक्षी म्हणते,"मी आताच तुझ्यासमोर जेवण केलं आहे. आता नको आहे मला काही". या संवादाच्या अखेरीस झहीर तिला "I love you" म्हणतो. त्यावर सोनाक्षी "I love you more" असं उत्तर देते. सोनाक्षीनं या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, "यामुळेच लोकांना वाटतं की मी प्रेग्नंट आहे, असं वागणं बंद कर झहीर". तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांचा गैरसमज दूर झाला आहे. प्रेग्नंसीच्या अफवांना खोडून काढणं हा सोनाक्षीचा चॅट शेअर करण्यामागचा हेतू होता.
दरम्यान, याआधी सोनाक्षीनं "माझं वजन वाढलंय मी गरोदर नाहीये" असं म्हणतं स्पष्टीकरण दिलं होतं. सोनाक्षी आणि झहीर २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी २०२२ मध्ये 'डबल एक्सएल' हा सिनेमाही एकत्र केला. जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने २३ जून २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. सोनाक्षी आणि झहीर सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. विविध व्हिडीओ आणि फोटो ते शेर करत असतात. तसेच आयुष्यात काय सुरू आहे, हे अपडेटही चाहत्यांना देताना दिसतात. त्यामुळे जर त्यांच्याकडे गुड न्यूज असल्यास ते सोशल मीडियावर जाहीर करतीलच, असंही तिचे काही चाहते म्हणत आहेत.