"विवाहित असूनही माझ्याशी संबंध ठेवले!" 'तौबा तौबा' फेम प्रसिद्ध गायकाची पोलखोल, अमेरिकन अभिनेत्रीने केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:04 IST2026-01-13T16:55:32+5:302026-01-13T17:04:31+5:30
तौबा तौबा फेम लोकप्रिय गायकाने लग्न केल्यानंतरही गर्लफ्रेंडशी संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे

"विवाहित असूनही माझ्याशी संबंध ठेवले!" 'तौबा तौबा' फेम प्रसिद्ध गायकाची पोलखोल, अमेरिकन अभिनेत्रीने केले गंभीर आरोप
'तौबा तौबा' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर करण औजला सध्या एका गंभीर वादामुळे चर्चेत आला आहे. एका कॅनेडियन अभिनेत्री आणि गायिकेने, जी 'एमएस गोरी' (Ms Gori) या नावाने ओळखली जाते, तिने करण औजलावर गंभीर आरोप केले आहेत. तिने दावा केला आहे की, करणने विवाहित असूनही तिच्याशी संबंध ठेवले आणि तिची फसवणूक केली.
या प्रकरणाची सुरुवात एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टवरून झाली. एमएस गोरीने इंस्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की करण औजला आणि त्याच्या टीमने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. तिने असा आरोप केला की, करणने तिची दिशाभूल केली आणि तो आधीच विवाहित आहे हे तिच्यापासून लपवून ठेवले. "या वर्षाने मला मीडियामध्ये माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींशी लढायला शिकवले आहे. माझे मत मांडणे किती महत्त्वाचे आहे, हे मला आता समजले आहे," असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
एमएस गोरीने पुढे असेही म्हटले आहे की, अनेक इन्फ्लुएन्सर्सनी तिच्याशी संपर्क साधला असून त्यांनाही या पंजाबी रॅपरकडून धमकावले जात आहे. खरं बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने दावा केला आहे की तिच्याकडे अशा काही स्क्रीन रेकॉर्डिंग्स आहेत, ज्यातून हे सिद्ध होते की करणची पत्नी पलक हिलाही या सर्व गोष्टींची आधीच कल्पना होती.
दुसरीकडे, करण औजला आणि त्याच्या टीमने अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. करण औजलाने २०२३ मध्ये मेक्सिकोमध्ये त्याची मैत्रीण पलकशी लग्न केले होते. पलक ही कॅनडातील एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि उद्योजिका आहे.
सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, चाहते यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी करणच्या बाजूने उभे राहत हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले आरोप असल्याचे म्हटले आहे, तर काही जण या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहेत. आता करणने गर्लफ्रेंड गोरीची खरंच फसवणूक केली आहे का? पतीवर झालेल्या आरोपांवर पलकची काय प्रतिक्रिया आहे? याकडे सर्वांचं लक्ष आहे.