शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:34 IST2025-02-20T10:33:48+5:302025-02-20T10:34:54+5:30

'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Shiv Jayanti 2025 Vicky Kaushal Film Chhaava Box Office Collection Day 6 Increased | शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराजांवरील 'छावा' सिनेमा (chhaava movie) १४ फेब्रुवारीला रिलीज झाला. या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा आहे. लक्ष्मण उतेकर (laxman utekar) यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय. विकी कौशलने (Vicky Kaushal) सिनेमात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालंय. प्रेक्षकांच्या तोंडी फक्त छावाचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून गेलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. काल शिवजयंतीच्या (१९फेब्रुवारी) दिवशी 'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे.

 सगळीकडे सध्या 'छावा'ची हवा पाहायला मिळतेय.  'छावा' नवे रेकॉर्ड बनवण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकतोय. 'छावा'नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी (शुक्रवार) ३३.१ कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यानं तो विकीच्या सोलो हिरो म्हणून कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग सिनेमा ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवार) सिनेमाने ३९.३ कोटींची कमाई केली. तर तिसरा दिवस रविवारी ४९.३ कोटींचा गल्ला सिनेमाने जमावला. चौथा दिवस सोमवारी २४.१ आणि पाचवा दिवस मंगळवारी २५.७५ कोटी कमावले. तर काल सहाव्या दिवशी म्हणजे  शिवजयंतीला (Shiv Jayanti 2025) चित्रपटाने तब्बल ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.  या चित्रपटाचे सहा दिवसांचे भारतातील कलेक्शन २०३.२८ कोटींपेक्षा अधिक झालं आहे.


१३० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आलेल्या सिनेमानं आपलं बजेट तर कधीच वसूल केलं आहे. आता लवकरच तो ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो. विकीची का कारकिर्द या सिनेमानं बदलून टाकली आहे. सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड आणि प्रेक्षकांचं मिळणार प्रेम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीत आता विकी कौशलचं वजन चांगलंच वाढलं आहे. 'छावा' चित्रपटाद्वारे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली. तसेच, चित्रपटात अक्षय खन्ना देखील आहे. अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून गेलं. 'छावा'ची क्रेझ इतकी आहे की, थिएटर्सनी २४ तास शो सुरू केलेत आणि सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल सुरू आहेत. 

Web Title: Shiv Jayanti 2025 Vicky Kaushal Film Chhaava Box Office Collection Day 6 Increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.